Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारामती परिमंडळात 106 कोटींची वीजबिल थकबाकी

ग्राहकांना थकीत वीजबिले भरण्याचे महावितरणचे आवाहनबारामती / प्रतिनिधी : महावितरणने वीजबिल थकबाकी वसुली मोहिम गतिमान केली आहे. बारामती परिमंडळात घरगुती

कराड पालिका ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात कचरा गाड्या उभ्या
एसटीच्या संपप्रश्‍नी खा. शरद पवार यांची मध्यस्थी?
महाबळेश्‍वर येथील साबने रस्ता सुशोभिकरणासाठी सुवर्णमध्य काढावा : ना. शंभूराज देसाई

ग्राहकांना थकीत वीजबिले भरण्याचे महावितरणचे आवाहन
बारामती / प्रतिनिधी : महावितरणने वीजबिल थकबाकी वसुली मोहिम गतिमान केली आहे. बारामती परिमंडळात घरगुती, वाणिजिक्य व औद्योगिक वर्गवारीतील 5 लक्ष 22 हजार ग्राहकांकडे 106 कोटी 22 लक्ष रूपये वीजबिलांची थकबाकी आहे. बारामती परिमंडळात चालू डिसेंबर महिन्यात 10 हजार 378 थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ग्राहकांनी चालू व थकीत वीजबिले भरून वीजपुरवठा खंडितची कटु कारवाई टाळावी, असे महावितरणचे आवाहन आहे.
वीजबिलांच्या थकबाकीत बारामती मंडळात 1 लक्ष 18 हजार ग्राहकांकडे 27 कोटी 65 लक्ष रूपये, सातारा मंडळात 1 लक्ष 77 हजार ग्राहकांकडे 23 कोटी 80 लक्ष रूपये तर सोलापूर मंडळात 2 लक्ष 27 हजार ग्राहकांकडे 54 कोटी 76 लक्ष रूपये थकीत आहेत. वीजबिल थकबाकीपोटी बारामती मंडळातील 2702, सातारा मंडळातील 778 तर सोलापूर मंडळातील 5490 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे.
विभाग निहाय वीजबिलांची थकबाकी आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. बारामती मंडळातील बारामती विभागात 42 हजार 973 ग्राहकांकडे 8 कोटी 52 लक्ष रूपये, केडगाव विभागात 50 हजार 978 ग्राहकांकडे 14 कोटी 81 लक्ष रूपये तर सासवड विभागात 24 हजार 629 ग्राहकांकडे 4 कोटी 31 लक्ष रूपये थकीत आहेत. सातारा मंडळातील कराड विभागात 46 हजार 363 ग्राहकांकडे 5 कोटी 85 लक्ष रूपये, फलटण विभागात 36 हजार 351 ग्राहकांकडे 5 कोटी 45 लक्ष रूपये, सातारा विभागात 42 हजार 996 ग्राहकांकडे 5 कोटी 28 लक्ष रूपये, वडूज विभागात 29 हजार 380 ग्राहकांकडे 4 कोटी 48 लक्ष रूपये तर वाई विभागात 21 हजार 939 ग्राहकांकडे 2 कोटी 73 लक्ष रूपये थकीत आहेत. सोलापूर मंडळातील अकलूज विभागात 20 हजार 267 ग्राहकांकडे 4 कोटी 47 लक्ष रूपये, बार्शी विभागात 44 हजार 215 ग्राहकांकडे 11 कोटी 92 लक्ष रूपये, पंढरपूर विभागात 39 हजार 950 ग्राहकांकडे 7 कोटी 89 लक्ष रूपये, सोलापूर ग्रामीण विभागात 61 हजार 486 ग्राहकांकडे 16 कोटी 22 लक्ष रूपये तर सोलापूर शहर विभागात 61 हजार 760 ग्राहकांकडे 14 कोटी 24 लक्ष रूपये थकीत आहेत.

COMMENTS