Homeमहाराष्ट्रअहमदनगर

शिक्षणाला आध्यात्मिकतेची जोड देण्याची गरज : माजी आ. पिचड

अकोले : विज्ञान जिथे संपते तिथून अध्यात्म सुरू होते. अंकांचा शोध जगात इतरत्र लागलेला असला तरी त्याची किंमत वाढते ती शून्याने आणि हा शून्य भारतातील

टाकळी शाळेत कुसुमाग्रज वाचन अभियान
अकोलेतील २१ खडी क्रशर केले सील  
आढळवाडी येथील हरिनाम सप्ताहाची सांगता

अकोले : विज्ञान जिथे संपते तिथून अध्यात्म सुरू होते. अंकांचा शोध जगात इतरत्र लागलेला असला तरी त्याची किंमत वाढते ती शून्याने आणि हा शून्य भारतातील आर्यभट्ट यांनी दिला. अध्यात्माशिवाय विज्ञान व गणित पूर्णच होऊ शकत नाही. शिक्षणाला अध्यात्मिकतेची जोड देण्याची गरज असे प्रतिपादन अमृतसागर दूध संघाचे चेअरमन तथा आदी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक माजी आमदार वैभव पिचड यांनी केले. 

तालुक्यातील उन्नती सेवा मंडळ राजूर संचलित, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा एकदरे या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पालक मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेच्या विश्वस्त हेमलता  पिचड, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून युवा साहित्य अभ्यासक संतोष दिवे, भरत घाणे,  विठ्ठल भांगरे,  यशवंत बेंडकोळी, काळू भांगरे,बाळू साबळे,प्रतीक साबळे, सुधीर कानवडे, विक्रम आरोटे,  मुख्याध्यापक प्रल्हाद नेहे, प्रभाकर येलमामे, सुदाम सदगीर, ज्ञानदेव पिचड, पी.एस.भांगरे, निवृत्ती भांगरे उपस्थित होते. 

या शाळेतील झांज पथकाच्या नृत्य आविष्काराने मान्यवरांचे स्वागत झाले. यावेळी शाळेतील गुणवत्ता प्राप्त व विविध स्पर्धांमध्ये यशस्वी  विद्यार्थ्यांचा  व खेळाडूंचा सन्मान वैभव पिचड यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच  परिसरातील पालकांचा व महिलांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेतील उपक्रमशील शिक्षक ललित छल्लारे यांनी अकोले तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या जीवनावर शब्दबद्ध केलेल्या गीताचे अनावरण करण्यात आले.  शिक्षक मच्छिंद्र शिंदे यांनी स्व.पिचड  यांवर आधारित स्वरचित गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक विक्रम आरोटे यांनी शाळेच्या सद्यस्थितीबद्दल आढावा घेत शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन दत्ता जाधव यांनी केले तर आभार प्रशांत बगणर  यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता जाधव यांनी केले तर आभार अनिल नवले यांनी मानले.

COMMENTS