बेलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ.केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरात मोहित्यांच्या वाड्यात १९२५ साली संघाची स्थापना केली, तर ग्वाल्हेर मध्ये अटलजी यांनी संघाची शाखा लावली. म्हणूनच अटलजी देशाचे पंतप्रधान झाले. सत्तेतून नव्हे तर त्यागामधून उभे केलेले लक्षावधी कार्यकर्ते निर्माण केल्याने देशात आणि राज्यात कमळ फुलले. राज्यकर्त्यांना याचा विसर पडू नये असे प्रतिपादन भाजपाचे माजी अध्यक्ष विष्णुपंत डावरे यांनी केले. भारतीय जनता पार्टी, बेलापूरच्या वतीने अटलजी यांचा जन्मदिन ‘सदैव अटल सुशासन’ दिवस पाळून अटलजींच्या तैलचित्रा समोर नतमस्तक होत त्यांना नमन केले. अटलजींच्या गतकालीन आठवणींना उजाळा देताना डावरे म्हणाले, तत्कालीन पक्षात आलेली मरगळ दूर करण्यासाठीच्या प्रवास दौर्याची सुरुवात अटलजींनी प्रथम बेलापूर येथून झाली. पक्षाचे काम ग्रामीण भागात जोमाने वाढावे यासाठी कै.पांडूरंग शिंदे यांच्या सायकलवर डबलसिट वर बसून पक्षाचे काम केले. कार्यकर्त्याच्या सायकलवर डबलसिट पक्षाचे काम करणारा नेता देशाचा पंतप्रधान झाला या आशयाचा वृत्तपत्रात छापून आलेला लेख त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला. अटलजी यांनी माझ्या लेखाची दखल घेवून त्यांंच्या हस्तअक्षरात मला पत्र पाठवून माझे आभार मानून माझे कौतूक केले. स्व. दिगंबर ढवळे गेल्या २५ वर्षापासून अटलजीच्या जन्मदिनाचे औचित्य साधून बुंदीच्या लाडूचे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करत असे. ती परंपरा आजही राखली जाते. जयंतीदिनी कार्यक्रमास सागर ढवळे, गोविंदराव खरमाळे. विजयराव साळुंके, अशोक गवते, प्रफुल्ल डावरे, राकेश कुंभकर्ण, पुरुषोत्तम भराटे, प्रभाकर ढवळे, किशोर महापुरे, सचीन वाघ, विष्णुपंत डावरे, शरदराव नवले, अभिषेक खंडागळे, बाळासाहेब काळे उपस्थित होते.
बेलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ.केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरात मोहित्यांच्या वाड्यात १९२५ साली संघाची स्थापना केली, तर ग्वाल्हेर मध्ये अटलजी यांनी संघाची शाखा लावली. म्हणूनच अटलजी देशाचे पंतप्रधान झाले. सत्तेतून नव्हे तर त्यागामधून उभे केलेले लक्षावधी कार्यकर्ते निर्माण केल्याने देशात आणि राज्यात कमळ फुलले. राज्यकर्त्यांना याचा विसर पडू नये असे प्रतिपादन भाजपाचे माजी अध्यक्ष विष्णुपंत डावरे यांनी केले. भारतीय जनता पार्टी, बेलापूरच्या वतीने अटलजी यांचा जन्मदिन ‘सदैव अटल सुशासन’ दिवस पाळून अटलजींच्या तैलचित्रा समोर नतमस्तक होत त्यांना नमन केले.
अटलजींच्या गतकालीन आठवणींना उजाळा देताना डावरे म्हणाले, तत्कालीन पक्षात आलेली मरगळ दूर करण्यासाठीच्या प्रवास दौर्याची सुरुवात अटलजींनी प्रथम बेलापूर येथून झाली. पक्षाचे काम ग्रामीण भागात जोमाने वाढावे यासाठी कै.पांडूरंग शिंदे यांच्या सायकलवर डबलसिट वर बसून पक्षाचे काम केले.
कार्यकर्त्याच्या सायकलवर डबलसिट पक्षाचे काम करणारा नेता देशाचा पंतप्रधान झाला या आशयाचा वृत्तपत्रात छापून आलेला लेख त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला. अटलजी यांनी माझ्या लेखाची दखल घेवून त्यांंच्या हस्तअक्षरात मला पत्र पाठवून माझे आभार मानून माझे कौतूक केले. स्व. दिगंबर ढवळे गेल्या २५ वर्षापासून अटलजीच्या जन्मदिनाचे औचित्य साधून बुंदीच्या लाडूचे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करत असे. ती परंपरा आजही राखली जाते.
जयंतीदिनी कार्यक्रमास सागर ढवळे, गोविंदराव खरमाळे. विजयराव साळुंके, अशोक गवते, प्रफुल्ल डावरे, राकेश कुंभकर्ण, पुरुषोत्तम भराटे, प्रभाकर ढवळे, किशोर महापुरे, सचीन वाघ, विष्णुपंत डावरे, शरदराव नवले, अभिषेक खंडागळे, बाळासाहेब काळे उपस्थित होते.

COMMENTS