Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरची सुट्टी होणार?

दिल्ली / प्रतिनिधी : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याभोवती सुरू असलेल्या अटकळींवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रतिक्रिया दिली

टेंभूच्या पाणी योजनातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार; आगामी काळात प्रभाकर देशमुखांच्या नेतृत्वाखाली माण-खटावचे प्रश्‍न मार्गी लावणार : ना. अजित पवार
Solapur : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन l Lok News24
महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजपा केंद्र सरकारचा निषेध मोर्चा

दिल्ली / प्रतिनिधी : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याभोवती सुरू असलेल्या अटकळींवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले की, गंभीर यांना प्रशिक्षक पदावरून हटवण्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहेत. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभवानंतर, बीसीसीआयमधील एका अधिकार्‍याने माजी भारतीय फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्याशी कसोटी संघाच्या प्रशिक्षक पदाबाबत चर्चा केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गंभीर यांचा प्रशिक्षक म्हणून रेकॉर्ड चांगला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने एक आयसीसी आणि एक एसीसी ट्रॉफी जिंकली आहे. मात्र, तगड्या देशांविरुध्द 10 कसोटी सामने गमावल्यानंतर लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये गंभीर यांच्या प्रशिक्षक म्हणूनच्या पध्दतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
वृत्तसंस्था पीटीआयच्या अहवालानुसार, बीसीसीआयमधील महत्त्वाच्या पदावर असलेल्या एका व्यक्तीने अनौपचारिकरीत्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्याशी संवाद साधून, ते लाल चेंडूच्या संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास इच्छुक आहेत का?, याची चाचपणी केली होती. मात्र, पुढे असे समोर आले की, लक्ष्मण सध्या बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये हेड ऑफ क्रिकेट या पदावर समाधानी आहेत.

COMMENTS