मुंबई / प्रतिनिधी : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बुंधुंची युती झाल्यानंतर त्य
मुंबई / प्रतिनिधी : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बुंधुंची युती झाल्यानंतर त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पक्ष जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. अशातच अखेर मुंबई महापालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने ठाकरे बंधुंबरोबर युती केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उबाठा मनसे यूतीकडून 10 जागा देण्यात आल्या आहेत. कोणत्याही क्षणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 52 जागांच्या मागणीचा प्रवास अखेर 10 जागांवर येऊन संपला आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष देखील सहभागी असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मुंबईत कोणाबरोबर जणार याबाबतची चर्चा सुरु होती. अखेर हा मुद्दा निकाली निघाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाची ठाके बंधूंबरोबर युती झालेली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीला शरद पवारांचा पक्ष आला आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरे बंधूंना बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राष्टरवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने काँग्रेस पक्षाबरोबर देखील चर्चा केली होती. त्यांच्यासोबत जाण्यासंदर्भात काही निर्णय झाला नाही. त्यानंतर अखेर ठाकरे बंधूबरोबर युती झाल्याची माहिती मिळत आहे.

COMMENTS