Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेडमध्ये कलाकेंद्रातील वेश्याव्यवसाय बंद करा : गणेश भानुसे

जामखेड : जामखेड हद्दीतील काही कलाकेंद्रात राजरोसपणे वेश्या व्यवसाय चालू आहे.या गंभीर बाबीकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पोलिसांवर कोणाचा तरी

भोकर तालुक्यात भाजपाला खिंडार
देवळाली प्रवरा नगरपालिकेत सांगता सभेच्या परवानगीवरून वाद ; कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
ज्येष्ठ समाजसेवक भीमरावजी दुधारे यांचे हृदयविकाराने निधन; भोकर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात शोककळा
Displaying 1005262201.jpg

जामखेड : जामखेड हद्दीतील काही कलाकेंद्रात राजरोसपणे वेश्या व्यवसाय चालू आहे.या गंभीर बाबीकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पोलिसांवर कोणाचा तरी दबाव आहे असे दिसते. त्या कलाकेंद्रातील वेश्याव्यवसाय बंद करा अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गणेश भानुसे यांनी दिला आहे. 

कलाकेंद्र हे पारंपरिक पद्धतीने लोककला जोपासत उपजिवीका करण्यासाठी आहे. मात्र काही पैशासाठी स्वार्थी लोकांनी पारंपरिक कलेच्या आड वेश्याव्यवसाय सुरू केला आहे. विशेषतः म्हणजे अल्पवयीन मुलींकडुन वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. या शहरात ९ कलाकेंद्र आहेत मात्र काही कलाकेंद्रात राजरोसपणे वेश्या व्यवसाय चालू आहे.या गंभीर बाबी जाणीवपूर्वक स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत आहे. हे बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल याची जवाबदारी स्थानिक प्रशासनाची राहीली असे जनशक्ती शेतकरी संघटना च्या वतीने गणेश भानुसे यांनी सांगितले.

COMMENTS