Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनतेच्या मनात वसलेला ‘विरु’ हरपला! :  मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, दि.२४: सुप्रसिद्ध चित्रपट ‘शोले’ मधील आमचा लाडका ‘विरु’ हरपला. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे,” अ

सांगली महापालिकेतील वीजबिल गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई : राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
NEET परीक्षेच्या धक्क्यातून विद्यार्थिनीची आत्महत्या; लातूरमधील दुर्दैवी घटना
प्रत्येक विद्यार्थ्याला शुद्ध पेयजल उपलब्ध करून देणार: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि.२४: सुप्रसिद्ध चित्रपट ‘शोले’ मधील आमचा लाडका ‘विरु’ हरपला. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे,” अशा शब्दात अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

मंत्री झिरवाळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे, भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महान कलाकाराने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांच्या जबरदस्त अभिनयामुळे ते चित्रपट रसिकांच्या मनात कायम जिवंत राहतील. धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना मंत्री झिरवाळ यांनी केली.

COMMENTS