Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी विषय महासंघाचा त्रिभाषा सूत्राला विरोध

श्रीरामपूर: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP) अंतर्गत प्रस्थापित असलेल्या त्रिभाषा सूत्राला  कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय महासंघ, म

विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडविण्यासाठी ‘वंदे मातरम्’चा संकल्प करूया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
धुळ्यातील अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू
प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची सेवा घडावी : कृषी मंत्री ॲड. कोकाटे
Displaying IMG-20251116-WA0011.jpg

श्रीरामपूर: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP) अंतर्गत प्रस्थापित असलेल्या त्रिभाषा सूत्राला  कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय महासंघ, महाराष्ट्र राज्य यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

नुकतेच पुणे या ठिकाणी महासंघाच्या शिष्टमंडळाने त्रिभाषा सूत्र निश्चिती समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांच्यासह शिक्षण संचालक व उपसंचालक  यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. महासंघाने निवेदनात स्पष्ट केले आहे की, बालवयात एकाच वेळी तीन भाषा शिकणे विद्यार्थ्यांच्या मनावर अन्यायकारक ठरेल आणि विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण होईल. त्यामुळे राज्यातील त्रिभाषा सूत्रऐवजी केवळ द्विभाषा सूत्राचा स्वीकार करण्यात यावा. यावेळी महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले (बारामती) यांनी सांगितले की, शासनाकडून कोणतीही मागणी नसताना त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा प्रयत्न होत आहे. महासंघाची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की, इयत्ता बारावीपर्यंत मराठी भाषा हा विषय अनिवार्य करण्यात यावा. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे व साहित्याचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषेला केवळ अनिवार्य नव्हे तर पदवीपर्यंत सक्तीची करण्याची गरज आहे. यावेळी महासंघाच्या शिस्त मंडळाने शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर आणि पुणे विभागीय उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांना संच मान्यतेसंदर्भातही महत्त्वाचे निवेदन दिले. प्रमुख मागण्यामध्ये संच मान्यतेमध्ये मराठी विषयाच्या अध्यापनासाठी एक तासिका वाढून मिळावी, मराठी विषयाला आयटी विषयाचा पर्याय देण्यास महासंघाचा सक्त विरोध आहे. निवेदन सादर करताना महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले (बारामती) यांच्यासह समन्वयक डॉ. पांडुरंग कंद, सचिव प्रा. बापू खाडे, पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रा. अरविंद मोडक आणि इतर प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

COMMENTS