युवतीच्या वैद्यकीय उपचारांसाठी  शिवसेना नगरसेवकांची मदत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवतीच्या वैद्यकीय उपचारांसाठी शिवसेना नगरसेवकांची मदत

कौटुंबिक हलाखाची परिस्थिती आणि त्यात मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च, यामुळे अडचणीत सापडलेल्या वर्पे परिवाराच्या मदतीला शिवसेनेचे माजी शहरप्रमुख

LOK News 24 I दखल ; तीन विचारधारेचे सरकार टिकणार ?
बेलापूरात महिलांचे पोलीस बांधवांसमवेत अनोखे रक्षाबंधन l LokNews24
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे शनिदर्शन

अहमदनगर/प्रतिनिधी- कौटुंबिक हलाखाची परिस्थिती आणि त्यात मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च, यामुळे अडचणीत सापडलेल्या वर्पे परिवाराच्या मदतीला शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम,  नगरसेवक दत्ता कावरे व माजी नगरसेवक आसाराम कावरे धावून आले आणि पाहता पाहता दोन लाखांची मदत वर्पे परिवाराला मिळवून दिली. 

    माळीवाडा येथील रहिवासी ऋतिका उत्तम वर्पे हिला डोकेदुखीच्या त्रासामुळे दवाखान्यात दाखल केल्यावर तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. वर्पे परिवाराने पैशांची कशीतरी जमवाजमव करुन मेंदूचे एक ऑपरेशन केले, परंतु दुसरे ऑपरेशन करणे आवश्यक असल्याने त्यासाठी मोठा खर्च डॉक्टरांनी सांगितला. वर्पे परिवाराची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने दुसर्‍या ऑपरेशनसाठी पैसे जमविणे त्यांना अवघड झाले होते. ही माहिती शिवसेनेचे माजी शहरप्रमुख कदम व नगरसेवक कावरे यांना समजल्यानंतर त्यांनी वर्पे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व पैशांची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर याबाबत संबंधितांना माहिती  दिली. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांनी मदतीचा हात पुढे करीत सुमारे 2 लाख 8 हजार रुपये जमा करून हा मदतीचा धनादेश वर्पे परिवाराकडे सुपूर्द केला. यावेळी कदम म्हणाले, सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अनेकांचे कामधंदे बंद आहे. अशा परिस्थिती घरखर्च भागवणेही मुश्किल असताना वर्पे कुटूंबियांवर अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे या कुटूंबियांना धीर देत ऋतिका हिच्या ऑपरेशनसाठी मदत जमा केली. जमा झालेल्या मदतीतून तिचे ऑपरेशन यशस्वी होईल व ती बरी होईल तसेच यापुढेही या कुटूंबियांच्या पाठिशी आम्ही उभे राहू, असे त्यांनी सांगितले. तर कावरे म्हणाले, संकटात मदत करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे, ही भावना मनात ठेवून वर्पे कुटूंबियांना मदत केली आहे. कोणत्याही चांगल्या कामांना अनेकांचा हातभार लागत असतो, त्याची प्रचित यानिमित्ताने आली. शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांच्या सुख-दु:खात सहभागी झालेली आहे. ऋतिका हिचे ऑपरेशन होऊन ती पूर्वीप्रमाणेच आनंदी राहील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या मदतीबद्दल वर्पे कुटूंबियांनी सर्वांचे आभार मानले.

COMMENTS