Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शीख समाज बांधवांनी गुरुनानक देवजी महाराज यांच्या शिकवणीचे आचरण करा- आ. खताळ

।संगमनेर : श्री गुरुनानक देवजी महाराज यांनी आपल्या शिकवणीतून सत्य, करुणा, समता, मानवता आणि सेवाभाव या मूल्यांचा अनमोल संदेश जगाला दिला. त्यांच्या

देशद्रोह्यांना वठणीवर आणण्यासाठी आर्थिक बहिष्कार प्रभावी : शरद पोंक्षे
राज्यातील सिंचन प्रकल्पासह उदंचन जलविद्युत प्रकल्पांची कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – मुख्यमंत्री फडणवीस
आपला दवाखान्याची वेळ गैरसोयीची
PHOTO-2025-11-05-15-57-11.jpg

।संगमनेर : श्री गुरुनानक देवजी महाराज यांनी आपल्या शिकवणीतून सत्य, करुणा, समता, मानवता आणि सेवाभाव या मूल्यांचा अनमोल संदेश जगाला दिला. त्यांच्या विचारांनी समाजात ऐक्य, बंधुता आणि परस्पर प्रेम वाढविण्याची प्रेरणा मिळते. आजच्या या जयंती निमित्त सर्व शीख बांधवांनी गुरुनानक देवजी महाराज यांच्या शिकवणीचे आचरण करावे असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी समाज बांधवांना केले.

गुरुनानक देवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील नेहरू चौक येथील गुरुद्वारामध्ये जाऊन आमदार अमोल खताळ यांनी गुरुनानक देवजी महाराजांचे मनोभावे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी माथा टेकवत आशीर्वाद घेतला. गुरुद्वारामध्ये गुरुनानक देवजी महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व समाजबांधवांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी, शहरातील शीख समाजबांधव, महायुतीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

गुरुनानक देवजी महाराज यांची शिकवण कीर्तन व लंगर सेवेद्वारे समाज बांधवांना मिळाली. तो प्रेमभाव एकोपा असाच कायम वाढू द्या. अशी प्रार्थना आमदार खताळ यांनी गुरुनानक देवजी महाराज यांच्या चरणी केली. या वेळी शीख समाजाचे त्रिलोकसिंग बत्रा, सुरेश डंग, जसपाल डंग, जतीन बत्रा, सुरज कालडा, जॉकी मिलानी, हरविंदर सिंग पंजाबी व जोगिंदर बत्रा यांच्यासह महायुतीचे जावेद जागीरदार, सिताराम मोहरेकर, दिलीप रावळ, दिनेश फटांगरे रेखा गलांडे, राहुल भोईर, शशांक नामन, लाला दायमा, वरद बागुल व ऋषिकेश मुळे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS