Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेहेकुरी–अभयारण्य फाटा रस्त्याचे काम दोन वर्षांपासून रखडले

कर्जत : कर्जत तालुक्यातील रेहेकुरी ते अभयारण्य फाटा या रस्त्याचे काम गेली दोन वर्षे रखडले असून, या अपूर्ण कामामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि महि

हिमायतनगरात तहेजीब फाउंडेशनच्यावतीने एकोणीस जोडपे विवाहबद्ध…
बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा
आषाढी वारीसाठी वारकर्‍यांच्या वाहनांना पथकरातून मिळणार सवलत
Displaying 1000082416.jpg

कर्जत : कर्जत तालुक्यातील रेहेकुरी ते अभयारण्य फाटा या रस्त्याचे काम गेली दोन वर्षे रखडले असून, या अपूर्ण कामामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि महिला यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या निकृष्ट आणि अपूर्ण अवस्थेमुळे अनेक अपघातही झाले असून, पावसाळ्यात तर या मार्गावरून प्रवास करणे नागरिकांसाठी कठीण बनले आहे.

या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या मागणीसाठी रेहेकुरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर मंगळवार, दि. ४ नोव्हेंबरपासून अमरण उपोषण सुरू केले होते. आज उपोषणाचा दुसरा दिवस असताना संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.

या उपोषणात ज्येष्ठ नेते माऊली मांडगे, सरपंच गणेश गायकवाड, उपसरपंच परशुराम मांडगे, माजी सरपंच दीपक मांडगे, युवा नेते सचिन मांडगे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश मांडगे सहभागी झाले होते.

ग्रामस्थांनी या रस्त्याच्या कामाबाबत आमदार रोहित पवार यांच्या जनता दरबार कार्यक्रमातही लेखी तक्रार दिली होती. आमदार पवार यांनी संबंधित विभागास काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीदेखील काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.

उपअभियंता वसंत बडे व दिनेश बडे यांनी आंदोलकांशी चर्चा करून ठेकेदाराकडून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

या वेळी पोप ट  राजाराम मांडगे, रावसाहेब गायकवाड, रफिक शेख, गणेश मांडगे, सुनील मांडगे, हनुमंत मांडगे, तुषार तनपुरे, अशोक मांडगे, बापूसाहेब मांडगे, प्रथमेश मांडगे, राजेंद्र पवार, महेश मांडगे, नितीन मांडगे, विशाल गायकवाड, योगेश मांडगे तसेच रस्त्याचे ठेकेदार, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS