मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परि

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील 246 नगरपरिषदा आण 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमाने यांनी जाहीर केला असून त्यानुसार येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर रोजी सुरूवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असेल. त्यानंतर अर्जांची पडताळणी केली जाईल. अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर अशी असेल. तर अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 25 नोव्हेंबर ही असेल. 26 नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. याच दिवशी त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटपही केले जाईल. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होईल. त्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. शासन राजपत्रात निकाल घोषित करण्याचा दिवस 10 डिसेंबर असेल.
राज्यातील 246 नगर परिषदा व 42 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. 6859 सदस्य व 288 अध्यक्ष यांची निवड होणार आहे. 246 नगरपरिषदांमध्ये 10 नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश आहे. 236 नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपली आहे.
चौकट—
असा असेल निवडणूक कार्यक्रम
अर्ज दाखल करण्याची सुरूवात ः 10 नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ः17 नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची मुदत ः 21 नोव्हेंबर
अंतिम उमेदवारी यादी जाहीर होणार ः26 नोव्हेंबर
मतदानाचा दिनांक ः 02 डिसेंबर
मतमोजणीचा दिनांक ः 03 डिसेंबर
राज्यात एकूण मतदार
एकूण मतदार ः 1 कोटी 7 लाख 3 हजार 576
महिला मतदार ः 53 लाख 22 हजार 870

COMMENTS