सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यामधील दिव्यांग बालकांकरीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि स्व. क्रांतिसिंह नाना पाटील
सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यामधील दिव्यांग बालकांकरीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या शिबीराचा जिल्ह्यातील दिव्यांग बालकांचे आरोग्य तपासणी शिबीर, दिव्यांग बालकांचे दिव्यांग प्रमाणपत्र, आधारकार्ड काढणे तसेच आयुष्यमान भारत कार्ड आणि आभा कार्ड काढणे हा मुख्य हेतू आहे.
शिबीरास मंगळवार, दि. 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 पासून सुरूवात होईल. शिबीराच्या दिवशी तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत. ज्या दिव्यांग बालकांचे दिव्यांग प्रमाणपत्र काढावयाचे आहे. त्यांनी ऑनलाईन नोंदणी करुनच सदर शिबीरास हजर रहावे. तसेच दिव्यांग बालकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढणे. आभा कार्ड काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. सोबत येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त दिव्यांग बालकांनी याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा तर्फे आवाहन करण्यात येत आहे. शिबीरामध्ये सहभागी होणार्या बालकांनी या कार्यालयास संपर्क साधावा. कार्यालयाचा पत्ता जिल्हा न्यायालय, सातारा इमारतीच्या पाठीमागे, 515, सदरबझार, सातारा, संपर्क क्र. 8591903611.

COMMENTS