पाटण / प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे पाटणचे प्रवेशद्वार असून ते देखणे व सुसज्ज होण्यासाठी सर्वोत्परी सहकार्य केले जाईल. कोय

पाटण / प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे पाटणचे प्रवेशद्वार असून ते देखणे व सुसज्ज होण्यासाठी सर्वोत्परी सहकार्य केले जाईल. कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सुधारणा करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामासाठी 50 लाख रुपये मंजूर झाले आहेत. दुसर्या टप्प्यासाठी देखील 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला जाणार असून म्हावशी पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे पर्यटन खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
म्हावशीपेठ (पाटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुधारणा करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (ए) चे जिल्हा युवा उपाध्यक्ष प्रतिक गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले, बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसिलदार अनंत गुरव, गटविकास अधिकारी सरिता पवार, समितीचे अध्यक्ष रविंद्र सोनावले, उपाध्यक्ष आत्माराम माने, आप्पासाहेब मगरे, शंकर शिंदे, सचिन कांबळे, कोषाध्यक्ष मिलिंद कांबळे, सहसचिव रुपेश सावंत, हिशेब तपासणीस संजय जाधव, सहकोषाध्यक्ष प्राणलाल माने, बौध्द विकास सेवा संघाचे अध्यक्ष भीमराव दाभाडे, राजाराम भंडारे, अशोक देवकांत, कैलास चव्हाण, संजय जाधव आदी मान्यवर यांचेसह स्मारक समितीचे पदाधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पाटण तालुका, बांधव, भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, मागील अनेक वर्षापासून स्मारकाच्या कामाकडे कुणीच लक्ष दिले नाही. मात्र हे भाग्य माझ्या नशिबी आले आहे. या स्मारकाचा पाया आधीच्या नेतृत्वाने घातला. पण त्यानंतर या ठिकाणी कोणी वळूनही पाहिले नाही. एवढ्या वर्षांत कोणी एकही मागणी केली नाही, हेच समाजाचं दुर्दैव आहे. तालुक्याने 21 वर्ष काही नेत्यांवर विश्वास ठेवून त्यांना आमदारकी व मंत्रीपद दिले, पण त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाकडे कधीच लक्ष दिले नाही. काही मोजक्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या औपचारिक निवेदनामुळे हे काम प्रत्यक्षात मार्गी लागले. सरकारकडून पहिल्या टप्प्यात 50 लाखांचा निधी मंजूर झाला असून भूमिपूजनाच्या कार्यक्रमात दुसर्या टप्प्यासाठी आणखी 50 लाखांचा निधी जाहीर करण्यात आला. एकूण 1 कोटींचा निधी देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणार आहोत. हे स्मारक जिल्हासह राज्यातील लोकांसाठी आकर्षणाचे ठिकाण बनेल.
प्रास्ताविक रविंद्र सोनवले यांनी कले. आभार सचिन कांबळे यांनी मानले. शहरासह मध्य पाटण, कोयना, ढेबेवाडी, मोरणा, चाफळ, तारळे, केरा व मल्हारपेठ विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS