Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गव्याच्या हल्ल्यातील वृध्दाचा अखेर मृत्यू

पाटण / प्रतिनिधी : कोयना भागातील गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेले शिवाजी पुनाजी कदम (वय 70, रा. ढाणकल, ता. पाटण) यांच्यावर कृष्णा हॉस्पिटल कराड 1

महावितरणने ठेकेदारांची बिले थकवल्याने 20 फेब्रुवारीपासून ठेकेदारांचा बंदचा इशारा
कराड तालुक्यातून दोन वर्षांमध्ये 116 गुंड हद्दपार
पन्नास लोकांचे सरकार अधिकार्‍यांच्या बदल्यात दंग : अजित पवार

पाटण / प्रतिनिधी : कोयना भागातील गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेले शिवाजी पुनाजी कदम (वय 70, रा. ढाणकल, ता. पाटण) यांच्यावर कृष्णा हॉस्पिटल कराड 10 दिवसाच्या उपचारानंतर सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला.
पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील ढाणकल येथील शिवाजी पूनाजी कदम शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास काफना नदी शेजारील शेतात जात असताना अचानकपणे गव्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात कदम यांच्या पायाला खोलवर जखमा झाल्या होत्या. हल्ल्याची माहिती समजताच वन्यजीव विभगाचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थानी घटनास्थळी पोहचुन जखमी कदम यांना हेलवाक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. त्याठिकाणी प्राथमिक उपचार केलेनंतर त्यांना पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे दाखल करण्यात आले होते.याच ठिकाणी तब्बल 10 दिवसाच्या उपचारानंतर सोमवारी त्याचे निधन झाले आहे.

COMMENTS