Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 करिअरसाठी उत्तम व प्रतिभावंत क्षेत्र निवडा : नवनाथ धुमाळ

कर्जत : "जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर उद्दिष्टे मोठी ठेवा. प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेवर यश अवलंबून असते. अंतर्मनाला वाटल्याशिवाय यश मिळत

राज्यात आठ महिन्यात ३.४१ लाख जातवैधता प्रमाणपत्रांचे वितरण
नागपूर ज‍िल्हा पर‍िषदेतर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २७ लक्ष ५१ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द
शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका रस्त्यावर
Displaying 1003119533.jpg

कर्जत : “जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर उद्दिष्टे मोठी ठेवा. प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेवर यश अवलंबून असते. अंतर्मनाला वाटल्याशिवाय यश मिळत नाही. काळाबरोबर बदलावे लागेल. सोशल मिडिया दुधारी शस्त्र आहे. कोणतेही काम किंवा क्षेत्र छोटे मानू नका. पुस्तक वाचनातून मस्तक नीट होईल, यशाची सुरुवात मस्तकातूनच होते. कौशल्याधारित असल्याशिवाय करिअर घडणार नाही. यशस्वीतेसाठी उत्तम आणि प्रतिभावंत क्षेत्र निवडा” असे मत प्रसिद्ध उद्योजक व्याख्याते व लेखक एन. बी. धुमाळ यांनी व्यक्त केले.

कर्मवीर जयंती सप्ताह व व्याख्यानमाला निमित्त महात्मा गांधी माध्यमिक, उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, सौ. सो. ना. सोनमाळी कन्या विद्यामंदिर व दादा पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने २० ते २९ सप्टेंबर या कालावधीत कर्मवीर व्याख्यानमालाचे आयोजन शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले आहे. मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी ‘उद्योजक आपल्या भेटीला’ या विषयावरील व्याख्यानरुपी दुसरे पुष्प प्रसिद्ध उद्योजक, व्याख्याते व लेखक एन. बी. धुमाळ यांनी गुंफले. रोटरी क्लब ऑफ कर्जत सीटी पुरस्कृत सदर व्याख्यान आयोजित केले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ कर्जत सीटीचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत राऊत होते. ते म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने स्वावलंबी बनले पाहिजे. नवतरुणांनी व्यवसायाकडे वळावे. उद्योजक बनण्यासाठी मोठी स्वप्ने पहा व ती स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करा असा संदेश त्यांनी याप्रसंगी दिला.

रोटरी क्लब ऑफ कर्जत सीटीचे फाउंडर चेअरमन डॉ. संदीप काळदाते यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ सीटीचे सचिव शाहबाज आतार, प्रोजेक्ट चेअरमन प्राचार्य राजकुमार चौरे, अनिल तोरडमल, प्रसाद ढोकरीकर, विशाल म्हेत्रे, नितीन देशमुख, दशरथ खोसे, ओंकार तोटे, अक्षय राऊत, दत्तात्रय भांडवलकर, रवींद्र जगदाळे, राहुल खराडे, सचिन गोरे, गणेश जेवरे, नानासाहेब सुद्रिक, रोहन पाटील, उपमन्यू शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर आदि मान्यवर तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. भागवत यादव, सूत्रसंचालन प्रा. राम काळे व प्रा.स्वप्निल म्हस्के तर आभार प्रा. राजेश दळवी यांनी मानले

COMMENTS