Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औकात में रहो, वरना..!

ज्यांची कर्म कु-किर्तीने भरलेली आहेत, अशा 'कुमार'वयीन भंपक आणि उपटसुंभांनी आमच्या नादी लागायचं नसतं! ज्यांना पत्रकार म्हणून लायकी सिध्द करता आली

विषवृल्लीला पोसणारे कोण ?
शैक्षणिक असमतोल
दहशतवादाच्या घटना चिंताजनक

ज्यांची कर्म कु-किर्तीने भरलेली आहेत, अशा ‘कुमार’वयीन भंपक आणि उपटसुंभांनी आमच्या नादी लागायचं नसतं! ज्यांना पत्रकार म्हणून लायकी सिध्द करता आली नाही, त्यांनी राज्यातील १४ आवृत्त्या असणाऱ्या आणि त्या देखील केंद्र व राज्य शासनाच्या यादीवर असलेल्या दैनिकाच्या रांगड्या नायकाशी वाकड्यात यायचं असेल तर, रान शेतात उगवणारी ‘कडू शेंदळ्या’ घेऊन नव्हे; तर, मर्द मराठी बाणा घेऊन लढावं लागेल. ज्यांच्या छातीचे पार ‘खोके’ झालेत, सांग(बांध)कामे अधिकाऱ्यांची हुजरेगिरी करित, त्यांचा पाठीचा कणा तरी शिल्लक राहिलाय का? हा विचार आधी त्यांनी करावा. ज्यांचा येथल्या मातीशी काडीचा संबंध नाही, ज्यांनी लोटा घेऊन लोटांगण घालित दलाली केली, अशांना सरळ नव्हे तर, पार माती चाटायला लावणं, हे आमच्या रांगड्या भूमीचं खास वैशिष्ट्य आहे.  ज्यांचे ‘पोल’ सरळ नसतात त्यांचे पाय देखील ‘खोल’ नसतात. अशा ‘खोलपोल’ नसलेल्या उपटसुंभांची ‘पोलखोल’ करणं हे तर, आमच्या हाताचा मळ असणारं काम.‌ त्यामुळे, आम्ही बजावतो आहोत,

तुम्हारा शोक बन गया है अपनी मर्जी से बात करना

अपनी आदतों को बदलो, हमारे बदल जाने से पहले !!

शेराला सव्वाशेर मिळतो ही मराठी म्हण कदाचित इथल्या मातीत ‘खोलपोल’ नसणाऱ्यांना माहीत नसेल, असं आम्ही गृहीत धरतो; अन्यथा, ज्यांच्या पत्रकारितेची सूत्र नेमकी काय आहेत, हे इतरांना काय त्यांची स्वतःलाच माहिती नसेल, त्यांनी त्यांच्याशी असंबंधित असलेल्या बाबीत तोंड खुपसण्याचा धंदा केला नसता आणि करू ही नये, ही आमची त्यांना इशारेवजा सूचना आहे. महाराष्ट्र ही भूमी महान इतिहास-संस्कृती असणारी भूमी आहे. या भूमीत पत्रकारिता करताना वैचारिक बांधिलकी आणि जाणीव असायला हवी. अशा प्रकारची जाणीव नसलेले झोला छाप पत्रकार आणि पत्रकारिता भूछत्रासारखी अकाली उगवताना दिसते.

अशा पत्रकारितेला ना बुड असतो, ना शेंडा! आमच्या पत्रकारितेची सुरूवात मुळातच सामाजिक जाणीवेतून झाली आहे. आजपावेतो समाजाच्या प्रश्नांवर कळकळीने लिहीलेले आमच्या लेखनाचे दहा ग्रंथ प्रकाशित झाले आहेत; ज्यांचे मुळ सूत्र सामाजिक न्याय हेच आहे! सामाजिक न्यायाच्या आमच्या व्याख्येत अवघा देश असतो. ज्या समुहाचे प्रश्न आहेत, ते सोडविले जावे ही आमची कळकळ असते.‌ सरकार आणि समाज यांच्यातील संवाद राखून समन्वय देखील साधला जायला हवा, ही आमची भूमिका राहिली आहे. शेवटी, समाजाला कोणतेही प्रश्न भेडसावत असले तर त्याची सोडवणूक करण्यासाठी शासनाकडेच जावे लागते. लोकांना धरणे, मोर्चे आणि अन्य कोणतेही संविधानिक मार्गाची आंदोलने करावी लागतात. परंतु, आमच्या पत्रकारितेने समाजाचे हे प्रश्न लेखनाच्या संवादातून शासनापर्यंत पोहचविण्याचे कार्य आजपावेतो केले आहे. राज्यात शासकिय यादीवर असणाऱ्या १४ आवृत्त्या दररोज प्रकाशित होत असताना आम्हाला काय मिळवता आले नसते? आम्ही नुसती इच्छा व्यक्त केली असती तरी, सरकारकडून मिळणाऱ्या कोणत्याही सोयी सुविधांपासून तर राजकीय सत्तेतील सहभागापर्यंत कोणतीही गोष्ट आम्हाला अशक्य नव्हती.‌ परंतु, आम्ही अशा बाबींसाठी कधीच पत्रकारिता केली नाही.‌ आम्ही आजही फुले-आंबेडकर बाण्याची पत्रकारिता करतो. आमच्या पत्रकारितेचे हेच आदर्श आहेत.‌ आजमितीला दोन तप अव्याहतपणे चालत असलेल्या आमच्या पत्रकारितेने व्यक्ती, समाज, संस्था, अशा कोणत्याही घटकाचे शोषण करणारी पत्रकारिता कधीच केली नाही. आजच्या दखल चा समारोप करताना एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावीशी वाटते की, अशा उपटसुंभ पत्रकाराला आंबेडकरी विचार समजून न घेताच केवळ जयभीम म्हणून काम भागवता येणार नाही! कारण, गाठ आमच्याशी आहे. आंबेडकरी विचार समजून न घेता आणि ते समजून घेण्याची तसदी न घेता, केवळ जयभीम संबोधन आपल्या एखाद्या लेखात लिहून, आंबेडकरी समुदायाचा वापर करण्याची शोषक मानसिकता ठेवणाऱ्या झोला छाप तथाकथित पत्रकाराला आम्ही इशारा देतोय की, 

औकात में रहो, वरना जो हम करना जानते है,

वो तुम्हारी सोच के बाहर है!

COMMENTS