कोरोनामुळे मृत झालेल्यांचे व त्यांचे अंत्यविधी परस्पर होत असल्याचे दुःख सहन करणारांची आर्थिक लूटमार थांबायचे नाव घेत नाही.
अहमदनगर/प्रतिनिधी-कोरोनामुळे मृत झालेल्यांचे व त्यांचे अंत्यविधी परस्पर होत असल्याचे दुःख सहन करणारांची आर्थिक लूटमार थांबायचे नाव घेत नाही. मृत झालेल्यांच्या नावावरील बँक खाती, कर्ज पॉलिसी, विमा भरपाई, गॅस नोंदणी वा अन्य कामांसाठी आवश्यक असलेला मृत्यू दाखला मिळण्यासाठी नगरमध्ये चक्क 600 रुपये रोकडा मोजावे लागत आहेत. मनपाच्या ज्या सेतू कार्यालयाद्वारे डिजीटल मृत्यू दाखले दिले जातात, ते कार्यालय कोविड निर्बंधांमुळे बंद आहे. त्यामुळे तेथून मृत्यूदाखला मिळणे दुरापास्त आहे. पण गरजवंतांनी पैसे मोजले की, काही वेळातच दाखला मिळतो. मनपा यंत्रणेच्या सहभागाशिवाय हे होणे अशक्य असल्याने दोषींवर कारवाई करणार का व ही लूटमार रोखणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाचे उपचार सुरू असलेल्या जिल्ह्यातील वा पर जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्यावर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार होतात. या मृत्यूंची माहिती संबंधित रुग्ण, ज्या रुग्णालयात उपचार घेत होता, तेथून मनपाला कळवली जाते व दुसरीकडे अमरधाममधूनही अंत्यसंस्कार झालेल्यांची माहिती मनपाच्या जन्म-मृत्यू नोंद विभागाला दिली जाते. या दोन्ही माहितींची पडताळणी होऊन या विभागाद्वारे मृत्यूदाखले ज्यांनी मागणी केली, त्यांना डिजीटल स्वरुपात नाममात्र शुल्क आकारून दिले जातात. डिजीटल असल्याने यावर कोणाची सही नसते तर फक्त मनपाचा शिक्का असतो. या पार्श्वभूमीवर मागील 8 एप्रिलपासून मनपाचे सेतु कार्यालय व जन्म-मृत्यू विभाग बंद आहेत. त्यामुळे मृत्यू दाखल्यांचे वितरण अधिकृतपणे बंद आहे. पण अनधिकृतपणे गरजवंतांना लुबाडून असे दाखले दिले जातात. मनपाच्या सेतू कार्यालयामागील बोळात व नगर-कल्याण रस्त्यावर हा गोरखधंदा सुरू आहे. मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले जाते. पण मनपात व मनपाच्या बाहेर मनपाच्या नावाने घडणार्या प्रत्येक गोष्टीची माहिती सर्वांना असते. शिवाय, असे बाहेर घडणारे प्रकार लपणारे नसतात, त्यांची कोठे ना कोठे वाच्यता होतेच. त्यामुळे कोणाला काही माहीत नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे व त्यामुळेच मनपातील काही उद्योगी मंडळींनी हा उद्योग सुरू केला तर नाही ना, असा संशयही बळावू लागला आहे.
नातेवाईकांची नवी लूटमार
कोरोना रुग्णांसाठी औषध व रेमडेसिविर इंजेक्शनसह ऑक्सिजनसाठी त्यांचे नातेवाईक भगीरथ प्रयत्न करतात, परंतु या कष्टदायक प्रयत्नांना पैशांची फोरणी द्यावी लागते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक कफल्लक होण्याच्या वाटेवर आहेत. औषधे, हॉस्पिटलचे बिल, रेमडेसिविर यासाठी अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत असतानाच आता मनपा प्रशासनातील काहीजणांकडून रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना टोपी घालण्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेतून मिळणारा मृत्यूचा दाखला हा एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. परंतु हा मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. हॉस्पिटल अथवा घरी मृत झालेल्यांची नोंदणी महापालिका कार्यालयात होते व नाममात्र शुल्क घेऊन नागरिकांना मृत्यू दाखला देण्यात येतो. परंतु कोरोनाच्या लाटेमध्ये वाहत्या गंगेत हात धुवून घेणार्यांची संख्या कमी नसल्याने म्हणूनच की
COMMENTS