Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगेंचे उपोषण पाचव्या दिवशी मागे

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी थेट मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने धडक दिली होती. तब्बल पाच दिवस म

आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
आपत्तीमध्ये नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी काम करावे : मुख्यमंत्री फडणवीस
नांदेड जिल्हा परिषद मुख्यालयात अस्वच्छतेचा विळखाड्रेनेज तुंबल्याने दुर्गंधी; कर्मचारी व नागरिक हैराण

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी थेट मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने धडक दिली होती. तब्बल पाच दिवस मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण केल्यानंतर पाचव्या दिवशी शासनाने त्यांच्या बहुतांश अटी मान्य केल्याने आणि हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय जारी केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून लिंबू सरबत घेतउपोषण सोडले. यावेळी त्यांनी आपल्या मागण्या मान्य केल्याप्रकरणी सरकारचे आभारही मानले. यावेळी जरांगे चांगलेच भावूक झाल्याचे दिसून आले.

मराठा समाजासाठी सुवर्णक्षण : मनोज जरांगे
संपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेषतः मराठवाड्यासाठी आज सोन्याचा दिवस आहे. माझ्या समाजाचे कल्याण झाले. हा माझ्या समाजासाठी सुवर्णक्षण असून आज दिवाळी साजरी करा, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठा आरक्षणासाठीचा शासन निर्णय आल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. तसेच यावेळी मनोज जरांगे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

COMMENTS