Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत मधून हजारो भाकरी, चटणी, ठेचा, फळे व पाण्याच्या बॉटल मुंबईकडे..

कर्जत : मराठा समाजाला  ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आजाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला कर्जत ता

सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील यांचे सहकारक्षेत्रासाठी मोठे योगदान : रामदास भोसले
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नागपूर उच्च न्यायालय वकील संघाच्या नवीन बार रूमचे उद्घाटन
सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार
Displaying 1002999401.jpg

कर्जत : मराठा समाजाला  ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आजाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला कर्जत तालुक्यामधून मोठा पाठिंबा मिळत आहे. मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या मराठा बांधवांना  जेवण मिळावे,पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून कर्जत तालुक्यामधून अनेक गावांमधून महिलांनी घरोघरी भाकरी, चपाती, चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा, तयार करून ते मुंबईकडे पाठवण्यासाठी दिले आहेत.

 कर्जत मध्ये छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान यांच्यावतीने  संभाजी महाराज चौकामध्ये  रविवारी मोठा आईसर टेम्पो भरून कर्जत मधून हजारो भाकरी, चटणी, ठेचा, फळे, बिस्किटे, चिवडा, तिखट व गोड पुऱ्या, तांदूळ, कांदा व पाण्याच्या बॉटल यासह अनेक पदार्थ मोठ्या संख्येने  मुंबईकडे  कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने घेऊन गेले आहे.

 दुरगाव येथे सकल मराठा समाज चिवडा व बुंदी

 कर्जत तालुक्यातील दुरगाव या गावामध्ये सकल मराठा समाज यांच्या वतीने चिवडा व बुंदी यांचे पाकीट व पिण्याच्या पाण्याची बॉटल हे सर्व साहित्य टेम्पो भरून मुंबईकडे नेण्यात आले. यावेळी रवी भगत यांनी सांगितले की, मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील मुंबई येथे आंदोलन करत आहेत. या आंदोलनामध्ये हजारो युवक सहभागी झाले आहेत. मात्र सरकारकडून आंदोलकांना पाणी व खायला अन्न मिळू नये यासाठी सर्व हॉटेल बंद केले आहेत. यामुळे दुरगाव येथील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत  चिवडा,बुंदी पाण्याची बॉटल हे टेम्पो भरून पाठवत आहोत व आंदोलनास आमचा पाठिंबा आहे सरकारने आमच्या मागण्यांचा तात्काळ विचार करावा अशी मागणी श्री भगत यांनी  केली.

 सकल मराठा समाज यांच्या वतीने मोठी मदत 

 सकल मराठा समाज यांच्या वतीने आज सोमवारी कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मुंबई येथील आंदोलकांना जेवणासाठी भाकरी,चटणी व इतर पदार्थ संकलन करणारे केंद्र उभा करण्यात आले होते. त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. खास करून सर्व माता भगिनींनी घरोघरी भाकरी चपाती तयार करून दिल्या.  तालुक्यातील गावा गावा मधून हजारो भाकरी, चटणी ठेचा, पाण्याची बॉटल व एक हजार किलो सफरचंद व इतर साहित्य  देण्यात आले. मुस्लिम समाजाकडून देखील मदत करण्यात आली आहे अशी माहिती समन्वयक रावसाहेब धांडे यांनी दिली.

 याशिवाय वडगाव तनपुरा, टाकळी खंडेश्वरी, आंबी जळगाव यासह तालुक्यातील अनेक गावांमधून  मुंबईतील आंदोलकांना जेवणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य पाठवण्यात आले आहे.

COMMENTS