Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये संत सद्गुरू गोदड महाराजांच्या यात्रेला सुरूवात

कर्जत : धाकटी पंढरी अशी ओळख असलेले कर्जत येथील ग्रामदैवत थोर संत सद्गुरु गोदड महाराज यांची रथयात्रेसाठी आज भाविकांचा जनसागर उसळला होता. दोन लाख भ

श्रीमती प्रज्ञा वाळकेंचा भ्रष्टाचारामध्ये उच्चांक ; सरकारविरोधी चळवळीतीही सक्रिय सहभाग ?
विमा संस्थांनी जनजागृती, विश्वासार्ह सेवांवर भर द्यावा – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन
नाचताना स्टेजवर पडली गौतमी पाटील

कर्जत : धाकटी पंढरी अशी ओळख असलेले कर्जत येथील ग्रामदैवत थोर संत सद्गुरु गोदड महाराज यांची रथयात्रेसाठी आज भाविकांचा जनसागर उसळला होता. दोन लाख भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतले. आणि मोठ्या उत्साहात कर्जत येथील रथयात्रा सुरू झाली. साक्षात पांडुरंगाचे आज कर्जत मध्ये आगमन होते. आणि त्यांच्या स्वागतासाठी ही रथयात्रा या ठिकाणी भरवण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. संत मीराबाई यांच्या वंशातील सद्गुरु गोदड महाराज यांनी येथे संजीवन समाधी घेतली आहे. राज्यातील ते एकमेव संत आहेत की ज्यांना एकादशीचा मान मिळाला.आहे. राज्यभरातून भाविक आज कर्जत येथे प्रसिद्ध असणाऱ्या रथयात्रेसाठी आले होते. भाविकांनी रात्री बारा वाजलेपासून दर्शन घेतले. अभिषेक करण्यासाठी देखील मोठी गर्दी झाली होती. विधान परिषदेची सभापती व आमदार रोहित पवार दोघेही उपस्थित होते. रथ यात्रा यानिमित्ताने आमदार रोहित पवार यांनी गोद ड महाराज यांनी दर्शन घेतले.या नंतर त्यांनी रथ ओ ढला . तसेच विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील आरती केली व दर्शन घेतले.

COMMENTS