दोनच नव्हे चार भाऊ एकत्र आले तरी, आम्ही तयार

Homeताज्या बातम्या

दोनच नव्हे चार भाऊ एकत्र आले तरी, आम्ही तयार

ठाकरे बंधूंना भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचे खुले आव्हान

मुंबई ः हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठी मुद्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत मुंबईत शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र लढल्यास त्याचा

सुरेगाव शासकीय वाळू डेपोतून जीपीएसप्रणाली नसतांनाही वाळू वाहतूक
खातेवाटपात वरचष्मा कुणाचा ?
गुदमरुन तब्बल 46 प्रवाशांचा मृत्यू की मोठा घातपात? | LokNews24

मुंबई ः हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठी मुद्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत मुंबईत शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र लढल्यास त्याचा परिणाम मुंबई महानगरपालिकेत दिसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात असतांनाच दुसरीकउे दोनच काय, चार भाऊ जरी एकत्र आले तरी आम्ही तयार आहोत, असे खुले आव्हानच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना दिले आहे.


आमदार प्रसाद लाड यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचत आमनेसामनेच्या लढाईचे आव्हान दिले आहे. ते सोमवारी विधिमंडळाच्या आवारात माध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना ललकारत समोरासमोरच्या लढाईचे आव्हान दिले. आम्ही वाटच बघतोय, दोन भाऊ एकत्र येऊ द्या, होऊ द्या महासंग्राम. दोन भाऊ काय पुतणे, भाचे आणि अजून चार भाऊ हे सगळे एकत्र येऊ द्या, आम्ही तयार आहोत. विजयी मेळाव्यात  उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषणात फरक होता.

उद्धव ठाकरे मराठीबद्दल काय बोलले, सगळं मराठी सोडून मगद्दाफर, मधोकाफ, मखंजीरफ हे शब्द त्यांनी भाषणात वापरले, असे प्रसाद लाड यांनी म्हटले. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे तयार आहोत. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना सोबत घेत आहेत. पण ज्याप्रकारे उद्धव यांनी राज ठाकरे यांचा अपमान केला होता. या सगळ्याबद्दल उद्धव ठाकरे हे  राज यांची माफी मागणार का?, असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला. मराठी भाषेबद्दल सगळ्यांना अभिमान आहे.

मराठी भाषेत बोलले पाहिजे, पण एखाद्याला मराठी येत नसेल हिंदी भाषिकांना मराठी बोलण्याची दादागिरी त्याला मारहाण करणे हे योग्य नाही, असे मतही प्रसाद लाड यांनी मांडले. यावर आता मनसे आणि ठाकरे गटाचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतेच टीकास्त्र सोडले होते. दोन्ही ठाकरे बंधूंच्या भाषणात अप्रामाणिकपणा होता. उद्धव यांच्या भाषणात तडफड दिसत होती. दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायला पाहिजे होते. राज ठाकरे यांची रस्त्यावर सत्ता असेल तर त्यांनी तिथे गोट्या खेळाव्यात, अशी बोचरी टीका आशिष शेलार यांनी केली होती.

COMMENTS