Shirdi : साई बाबांविषयी अपप्रचार करणार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई

Homeताज्या बातम्या

Shirdi : साई बाबांविषयी अपप्रचार करणार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई

शिर्डी प्रतिनिधी /साईबाबा संस्थान आणि साईबाबांविषयी समाज माध्यमे व प्रसारमाध्यमांवर पसरवली जात असलेली चुकीची, दिशाभूल करणारी व बदनामीकारक माहिती

भारतात सात कोटी सत्तर लाख मधुमेही
20-25 प्रवाशांसह जाणारी बस रस्त्यात पेटली (Video)
क्रीडाक्षेत्रासाठी सुवर्णकाळ…

शिर्डी प्रतिनिधी /
साईबाबा संस्थान आणि साईबाबांविषयी समाज माध्यमे व प्रसारमाध्यमांवर पसरवली जात असलेली चुकीची, दिशाभूल करणारी व बदनामीकारक माहिती ही अत्यंत गंभीर व दु:खद बाब आहे. याविरोधात संस्थानकडून कठोर कायदेशीर पावले उचलण्यात येत असून अशा प्रकारच्या अपप्रचाराला कदापिही पाठीशी घातले जाणार नाही, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

अलिकडेच सोशल मीडियावर साईबाबा संस्थानने हज यात्रेसाठी 35 कोटी रुपयांचा निधी दिला आहे असा भ्रामक व खोटा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. संस्थानने यासंदर्भात स्पष्टपणे सांगितले आहे की, अशा कोणत्याही प्रकारचा निधी वितरित केलेला नाही. हा संपूर्ण दावा खोटा, निराधार व श्रद्धाळू भावनांशी खेळ करणारा आहे.

साईबाबा संस्थानचा संपूर्ण कारभार महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या साईबाबा संस्थान विश्वस्थ व्यवस्थापन अधिनियम, 2004 नुसार पारदर्शकपणे व नियमबद्ध रीतीने केला जातो. संस्थानमध्ये येणार्‍या देणग्यांचा उपयोग 550 खाटांचे अद्ययावत हॉस्पिटल, आशियातील सर्वात मोठे प्रसादालय, शैक्षणिक संकुल, भक्त निवास आणि इतर सार्वजनिक हिताच्या उपक्रमांसाठी केला जातो. देणगी फक्त अधिकृत दानपेट्या आणि अधिकृत काउंटरवरच स्वीकारली जाते. इतर कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण केली जात नाही.

संस्थानच्या तदर्थ समितीस 50 लाखांपर्यंतच्या खर्चाचे स्वातंत्र्य आहे. त्यापुढील सर्व खर्चांसाठी उच्च न्यायालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. साईबाबांवरील प्रेम, श्रद्धा आणि भक्ती जपणार्‍या लाखो भक्तांच्या भावना आणि संस्थानची प्रतिष्ठा राखण्यासाठी, भविष्यातही अशा प्रकारच्या अपप्रचार करणार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे श्री. गाडीलकर यांनी स्पष्ट केले.

COMMENTS