राहुरी कृषी विद्यापीठाचा १ कोटींचा मानहानीचा दावा कोर्टाने फेटाळला

Homeमहाराष्ट्र

राहुरी कृषी विद्यापीठाचा १ कोटींचा मानहानीचा दावा कोर्टाने फेटाळला

अहिल्यानगर प्रतिनिधी /महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रशासनाने बाळासाहेब जाधव यांच्याविरोधात दाखल केलेला एक कोटींचा मानहानीचा दावा जिल्हा न्यायालया

नॅशनल पिनॅकल अवार्डने संतोष यादव यांचा गौरव
कंत्राटी वीज कर्मचार्‍यांचे राज्यभर आंदोलन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून हक्काचा आधार मिळाल्याची भावना

अहिल्यानगर प्रतिनिधी /
महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रशासनाने बाळासाहेब जाधव यांच्याविरोधात दाखल केलेला एक कोटींचा मानहानीचा दावा जिल्हा न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश माया देशमुख यांच्या फेटाळून लावला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,२०१६ साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. के. पी. विश्वनाथा यांची व फेब्रुवारी-२०१९ मध्ये कुलसचिवपदी उपजिल्हाधिकारी सोपान
कासार यांची नियुक्ती झाली होती.

कुलगुरू डॉ. विश्वनाथा व कुलसचिव कासार हे या पदासाठी पात्र नसल्याचा आरोप करीत टाकळीमिया (ता. राहुरी) येथील बाळासाहेब जाधव यांनी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, कृषी सचिव यांच्याकडे पुराव्यासह तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन शासनाने चौकशी समिती नेमली.

     महासंचालक (महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे) यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. त्या अनुषंगाने महासंचालकांनी कृषी विभाग व शासनाला सविस्तर अहवाल सादर केला. कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी शासनाने दिलेल्या जाहिरातीमधील शैक्षणिक पात्रता, विभागप्रमुखाचा अनुभव व काही नियम-अटी घालून दिल्या होत्या.परंतु के. पी. विश्वनाथ यांना विभागप्रमुख पदाचा अनुभव कमी असल्याने ते कुलगुरू पदासाठी पात्र होत नाहीत. त्यामुळे त्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी झालेली नियुक्ती चुकीची असल्याचे अहवालात म्हटले होते.

उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांची कुलसचिवपदी झालेली नियुक्ती नियम व अटीचे पालन न करता, तसेच व ग्रेड पे कमी असतानाही झाल्याची तक्रार जाधव यांनी शासनाकडे कागदपत्रांसह केली होत्या. त्याबाबत विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे कृषी विद्यापीठातील अन्नशास्त्र विभागप्रमुख डॉ. उत्तम ज्ञानू चव्हाण यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकरिता व कुलगुरू,कुलसचिव यांच्यामार्फत अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयात बाळासाहेब जाधव यांच्याविरुद्ध एक कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला होता.

तपासात निष्पन्न झालेल्या बाबी
अहिल्यानगर जिल्हा न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. कृषी विद्यापीठातर्फे डॉ. उत्तम चव्हाण, कुलसचिव सोपान कासार यांची साक्ष व उलट तपासणी घेण्यात आली. डॉ. चव्हाण व कासार यांना बाळासाहेब जाधव यांच्याविरोधात पुरावे सादर करता आले नाही.तसेच,वादीच्या बाजूने जे साक्षीदार तपासले,त्यांनी खोटी साक्ष दिल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने,या साक्षी ग्राह्य धरल्या नाहीत.

प्रतिवादी बाळासाहेब जाधव यांच्याकडे कागदपत्रे व पुरावे असल्याचा युक्तिवाद जाधव यांचे वकील के. एम. देशपांडे यांनी केला.जिल्हा न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश माया देशमुख यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून,साक्षी पुरावे तपासून राहुरी कृषी विद्यापीठातर्फे डॉ. उत्तम चव्हाण यांनी दाखल केलेला एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा फेटाळून लावला.

COMMENTS