जिल्ह्याभरात कडूनिंब वृक्षांवर हुमणी भुंगेर्‍यांचा हल्ला; रुई चीक फवारणीचे व पीक फेरपालटाचे आवाहन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्याभरात कडूनिंब वृक्षांवर हुमणी भुंगेर्‍यांचा हल्ला; रुई चीक फवारणीचे व पीक फेरपालटाचे आवाहन

अहमदनगर/प्रतिनिधी- जिल्हाभरातील कडूनिंबाच्या झाडांवर हुमणी भुंगेर्‍यांचा हल्ला झाला असून, यामुळे वृक्ष वाळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या भ

अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताचा प्रयत्न…गुन्हा दाखल
कोरेगावमध्ये शाळकरी मुलींना सायकल वाटप
अगस्ती भूषण पुरस्काराने मधुकरराव नवले, विश्‍वासराव आरोटे सन्मानीत

अहमदनगर/प्रतिनिधी- जिल्हाभरातील कडूनिंबाच्या झाडांवर हुमणी भुंगेर्‍यांचा हल्ला झाला असून, यामुळे वृक्ष वाळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या भुंगेर्‍यांचा अन्य पिकांना त्रास होऊ नये म्हणून शेतकर्‍यांनी पीक फेरपालटाच्या प्रयत्न करावा तसेच कडूनिंबावर रुई चीक फवारणी करण्याचे आवाहन निसर्ग अभ्यासकांकडून करण्यात येत आहे.
भिंगार येथील निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांनी याबाबत सांगितले की, जिल्ह्याभरात ठिकठिकाणी कडूनिंबांचे वृक्ष वाळून जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर निसर्गप्रेमी व जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहामार्फत जिल्हाव्यापी सर्वेक्षण करण्यात आले.यात हुमणी कीटकांच्या भुंगेर्‍यांचे प्रमाण यावर्षी तुलनेने प्रचंड वाढल्याने त्याचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर कडूनिंब वृक्षांवर दिसून येत आहे व जिल्ह्याभरात ठिकठिकाणी कडूनिंबांचे वृक्ष वाळून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणात मनपा उद्यानविभागप्रमुख मेहेर लहारे यांच्यासह उमेश भारती,अतुल सातपुते,राजेंद्र बोकंद,संजय बोकंद,विजय परदेशी,अजिंक्य सुपेकर,विठ्ठल पवार,शशीभैय्या ञिभुवन,श्रीराम परंडकर,संदीप राठोड,अंकुश ससे,सतीश गुगळे,नितीन भोगे,मच्छिंद्र रासकर,प्रवीण साळुंके,विलास नांदे,अमित गायकवाड आदी सुमारे 30निरीक्षक सहभागी झाले सहभागी झाले होते. वातावरणातील व नैसर्गिक अन्नसाखळ्यांच्या असमतोलामुळे हुमणीच्या कीटकांचे प्रमाण यावर्षी तुलनेने प्रचंड वाढल्याने त्याचा प्रादूर्भाव मोठ्याप्रमाणावर कडूनिंब वृक्षांवर दिसून येत आहे. हुमणी हा शेती, फळबागा तसेच इतर वनस्पतींसाठी अतिशय उपद्रवी कीटक असून यांची वाढती संख्या भविष्यासाठी चिंताजनक असल्याची माहीती वनस्पती अभ्यासक प्रितम ढगे यांनी दिली.

अशी घ्यावी काळजी..
कोषातून बाहेर पडलेला प्रौढ भुंगेरा हा मुख्यत्वे कडूनिंब व बाभूळ या वृक्षांची पाने खातो. यावर्षी या हुमणी कीटकांचे प्रमाण जिल्ह्यात अनेक ठिकाणी इतके प्रचंड आहे की, काही ठिकाणी संपूर्ण कडूनिंबाचे झाड पूर्णपणे वाळून गेल्याचे दिसले आहे. त्यामुळे कोणतेही रासायनिक औषधे फवारून या किडीचे नियंञण करण्यापेक्षा रूईच्या चिकाची फवारणी तसेच बेडुक तसेच कावळे,ससाणा,चिमण्या अशा नैसर्गिक अन्नसाखळ्यांद्वारे या किडीचा प्रादूर्भाव कमी करता येऊ शकतो.जास्त प्रादुर्भावग्रस्त शेतात हुमणीस कमी बळी पडणारे पीक घेऊन पिकांची फेरपालट केल्यास हुमणी नियंत्रणात आणता येईल, अशी माहिती निसर्गप्रेमी व जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहामार्फत देण्यात आली आहे.

भारतात तीनशे प्रजाती
भारतामध्ये हुमणीच्या सुमारे 300 प्रजाती असून, त्यातील लिकोफोलिस आणि होलोट्रॅकिया अशा दोन प्रजाती आपल्या राज्यामध्ये आढळतात. हुमणीचा जीवन क्रम अंडी,अळी,कोष व कीटक या अवस्थांमधून पूर्ण होतो. हुमणी अळीचे मुख्य खाद्य वनस्पतींची मुळे व साली असून अळी अवस्थेत ती शेतीपिकांचे सर्वांत जास्त नुकसान करते. पावसाळा सुरू होताच म्हणजे साधारणतः जून महिन्यातील पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन थव्यांच्या रुपाने सूर्यास्तादरम्यान कडूनिंब, बाभूळ या झाडांवर रात्री गोळा होऊन त्यांच्या पानांवर उपजीविका करतात तर दिवसा जमिनीत राहतात. हे भुंगेरे सुमारे 100दिवस जगतात.

COMMENTS