नेवासा फाटा : महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथील पोलीस पाटील अनिल माकोणे यांची
नेवासा फाटा : महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथील पोलीस पाटील अनिल माकोणे यांची निवड करण्यात आली आहे.राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे यांनी अनिल माकोणे यांना निवडीचे पत्र दिले आहे. पोलीस पाटील असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी अंमळनेर ग्रामस्थांच्या वतीने अनिल माकोणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
नागरी सत्कार कार्यक्रम प्रसंगी अजित दादा गट राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे,माजी सरपंच अण्णासाहेब घावटे,सरपंच ज्ञानेश्वर आयनर, ह.भ.प. संपत महाराज पवार, अँड.संजय माकोणे,नेवासा तालुका एकलव्य संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब बर्डे, चंद्रकात माकोणे, नानासाहेब माकोणे, लक्ष्मण बोरूडे, विलास बर्डे,जयवंत माकोणे, अँड.नितिन घावटे,रमेश मोरे,रंगनाथ आयनर, अण्णासाहेब माकोणे,शाम घावटे, अभिजित माकोणे, किशोर मोरे,डाॅ.ऋषिकेश माकोणे, जनार्धन घावटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस पाटील असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पद अनिल माकोणे यांच्या रूपाने नेवासा तालुक्याला मिळाल्याबद्दल त्यांचे विविध संघटना मंडळांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
COMMENTS