Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवरायांचा पुतळा विटंबना : राहुरीत पाळला कडकडीत बंद

देवळाली प्रवरा : राहुरी शहरातील बुवासिंध बाबा तालिममधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केल्याची घटना

सामान्यांचा विकास हीच आमची एकमेव भूमिका
पाचोरा तालुक्यातील अवकाळी पावसाची हजेरी
श्री अंबाबाई मंदिरात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

देवळाली प्रवरा : राहुरी शहरातील बुवासिंध बाबा तालिममधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केल्याची घटना घडल्याने राहुरी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.संतप्त शिवप्रेमींनी तालुका बंदची हाक दिली होती. तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.देवळाली प्रवरा येथे यात्रा उत्सव असल्याने दुपारपर्यंत बंद पाळून समाजकंटकाचा जाहिर निषेध करण्यात आला.

         शिवप्रेमींनी या घटनेच्या निषेधार्थ काल रास्तारोको आंदोलन मागे घेताना  राहुरी तालुका बंदची घोषणा करण्यात आली होती.तालुक्यातून बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.राहुरी फॅक्टरी, टाकळीमिया,वांबोरी, सोनगाव देवळाली प्रवरा आदी भागात  सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेऊन घटनेचा निषेध नोंदविला आहे. टाकळीमिया ता.राहुरी येथिल शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून फुलहार वाहण्यात आले.ग्रामस्थांच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.  यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, सुभाष जुंदरे, बाळासाहेब जाधव, सिकंदर शेख, अकबर सय्यद, सचिन करपे, उमेश कवाने, रमेश सोनवणे, संभाजी करपे,बंडू गायकवाड आदींसह सर्व ग्रामस्थ, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS