विश्‍वासात न घेता पदोन्नती आरक्षण रद्द ;  काँग्रेसचा नाराजीचा सूर; सरकारमधील विसंवाद चव्हाट्यावर

Homeताज्या बातम्या

विश्‍वासात न घेता पदोन्नती आरक्षण रद्द ; काँग्रेसचा नाराजीचा सूर; सरकारमधील विसंवाद चव्हाट्यावर

पदोन्नतीतील आरक्षण एकाएकी रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे.

ईडीकडून अजित पवारांना दिलासा
भीषण अपघात, दोघांचा जागीच अंत | LOKNews24
पत्नीऐवजी दिला भलत्याच पुरुषाचा मृतदेह | LOK News 24

मुंबई/प्रतिनिधी: पदोन्नतीतील आरक्षण एकाएकी रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला विचारत न घेता आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्या मंत्र्यांनीदेखील आम्हाला हेच सांगितले. पदोन्नतीतील आरक्षणाचे धोरण सरकारने ठरवावे. यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

पदोन्नतीतील आरक्षणाचे धोरण राज्य सरकारने ठरवावे, यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ द्यावी असा आग्रह आम्ही धरला आहे. या प्रश्‍नी मुख्यमंत्र्याशी चर्चा करू. त्यानंतर आमची भूमिका ठरवू, असे पटोले म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ देण्याचे मान्य केले होते; मात्र ’तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी त्यांना कोकणात जावे लागले. त्यामुळे आमच्या भेटीला विलंब झाला, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. या भेटीतून मार्ग निघेल. समस्येचे निराकरण होईल अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. पदोन्नतीतील आरक्षण रद्द होण्याचे मूळ देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात आहे. फडणवीस सरकारने केलेल्या दिरंगाईमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली. सर्वांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे. या भूमिकेतूनच काँग्रेसने देश उभा केला आहे; मात्र काही जण आता तोच देश विकत आहेत, असे म्हणत पटोले यांनी भाजपला टोला लगावला. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास काँग्रेस वेगळा विचार करणार का, सत्तेतून बाहेर पडणार का, या प्रश्‍नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.

COMMENTS