Homeताज्या बातम्यासंपादकीय

“भाजप’चा प्रस्थापित नेत्यांना धक्का !

भाजप हा पूर्वीसारखा पक्ष आता राहिलेला नाही. कारण हा पक्ष संपूर्णपणे पक्षाचा विचार करतो, त्यामुळे पक्षापुढे व्यक्ती या गौण ठरतात. पक्ष मोठा असून,

काँगे्रसला ‘बळ’ मिळेल का ?
सत्ता केंद्रीकरणाचा धोका
रंगभूमीचा खरा इतिहास

भाजप हा पूर्वीसारखा पक्ष आता राहिलेला नाही. कारण हा पक्ष संपूर्णपणे पक्षाचा विचार करतो, त्यामुळे पक्षापुढे व्यक्ती या गौण ठरतात. पक्ष मोठा असून, त्याच्या वाढीसाठी निर्णय घेतले जातात, व्यक्तीसाठी नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारात आल्याचे दिसून येत आहे. खरंतर भाजपने मंत्रिमंडळ विस्तारात सुधीर मुनगंटीवार यांना संधी दिली नाही. त्यानंतर खातेवाटपांत भाजपने ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा धक्का दिला. खरंतर गिरीश महाजन भाजपचे संकटमोचक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात, त्यांना देखील जलसंपदा सारख्या दुय्यम खात्याची जबाबदारी दिली. तर दुसरीकडे गेल्या सरकारमध्ये महसूलमंत्री, गृहनिर्माण आणि पशुसंवर्धन अशी महत्वाची खाती असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना देखील दुय्यम असे जलसंपदा खाते देण्यात आले आहे. त्यातच ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करत त्यांच्याकडे मंत्रिपद दिले असले तरी, पर्यावरण व पशूसंवर्धन ही बिगरमहत्वाची खाती त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या नेत्यांना भाजपने एकप्रकारे संदेशच दिल्याचे दिसून येत आहे.
मुळातच राज्यात असो की देशात काँगे्रसचे जे पानीपत झाले, त्यामागे महत्वाचे कारण म्हणजे पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तीनिष्ठा या पक्षात वाढत चालली होती. त्यामुळे अनेक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अनेक नेत्यांनी आपले प्रस्थ निर्माण केले होते. ते नेते म्हणतील ती दिशा अशी त्या राज्यात परिस्थिती होती. पक्षाने वेगळा निर्णय घेतल्यास संबधित बडे नेते राज्यातील त्या पक्षाचे संपूर्ण आमदार घेवून कोणत्यातरी पक्षात सहभागी होण्याचे किंवा, स्वतंत्र पक्ष काढण्याची ताकद ठेवत होते. त्यामुळे पक्षाला एकप्रकारे ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार हा होता. त्यामुळे काँगे्रसच्या नेत्यांनी आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात नवे नेतृत्व प्रस्थापित होवू दिले नाही, त्याचबरोबर राजकीय संरजामदारी वाढवण्यात हातभार लावला. त्यामुळे काँगे्रसचे पानीपत झाले. मात्र भाजप हा चाणाक्ष पक्ष आहे. तो पक्षापुढे व्यक्तींना मोठे होवू देत नाही. त्यामुळेच पक्षाला चांगले दिवस पाहायला मिळतात. त्याचबरोबर वेळेवर भाकरी फिरवून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सूचक इशारा देवून पक्ष संघटनेत सक्रीय योगदान दिल्याचे सूचवले जाते. ती प्रक्रिया मात्र काँगे्रस पक्षात होतांना दिसून येत नाही. त्यामुळेच भाजपने यावेळेस अनेक नव्या चेहर्‍यांना संधी दिल्याचे दिसून येत आहे. यासोबतच ग्रामीण भागात भाजप पुन्हा एकदा आपले पाळेमुळे घट्ट करण्यासाठी सरसावल्याचे दिसून येत आहे. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे आगामी काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार्‍या निवडणुका. यासोबतच भाजपने शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकामसारखे महत्वाचे खाते सोपवले आहे. खरंतर यातून सत्तासमीकरण साधण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. ज्या पक्षात भाजपची ताकद कमी आहे, त्या जिल्ह्यात महत्वाचे खाते देवून पक्षाचा विस्तार करण्यासाठी ही एकप्रकारे ताकद दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपमध्ये पक्षनिष्ठा महत्वाची ठरतांना दिसून येत आहे. व्यक्तीनिष्ठा आणि व्यक्तीचे प्रस्थ मोठे होणार नाही, याची पुरेपूर काळजी यानिमित्ताने घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच ग्रामविकास, जलसंपदा, वैद्याकीय शिक्षण, पर्यटन अशा खात्यांचे मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांना जलसंपदामंत्री पद दिले. वास्तविक पाहता या विभागाचे तीन विभाग करून तीन स्वतंत्र मंत्री देण्यात आले आहे. गेल्या मंत्रिमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तीन नंबरचे महत्वाचे पद महसूलमंत्री पद होते. त्यामुळे यावेळेस देखील त्यांना महसूलमंत्री पद देण्यात येईल किंवा, कृषी, ग्रामविकास सारखे महत्वाचे खाते देण्यात येईल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना जलसंपदा खाते देवून त्यांना देखील भाजपने धक्का दिला आहे. खरंतर अहिल्यानगर जिल्ह्यात विखे यांनी 12 पैकी 10 महायुतीच्या जागा निवडून आणल्या आहेत. काँगे्रसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करण्याचे त्यांना मोठे बक्षीस पक्षाकडून दिले जाईल असे बोलले जात होते, मात्र त्याउलट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप कुणाला ग्रहित धरत नाही, तेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

COMMENTS