मुंबई :माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झ
मुंबई :माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती त्यांचे चिरंजीव व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची प्रकृती अस्वास्थमुळे ते मुंबईत वैद्यकीय उपचार घेत आहेत. गुडघ्याच्या समस्येमुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रीच कँडी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली.
COMMENTS