Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्या देशात परिवारात स्त्रियांची पूजा होते, तिथे सुख नांदते :ह.भ.प.दादा महाराज रंजाळे

श्रीरामपूर : श्रीकृष्ण हे अहिंसा, प्रेम, भक्ती, वीरत्व आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यांचे जीवनचरित्र सर्वश्रेष्ठ आहे. त्यांनी बलाढ्य क्रूरतेला हर

आंबिजळगावमधून तुतारीला जोरदार पसंती : हभप बापूराव निकत
ठेकेदाराने दिली मजुरांना दिवाळीची परस्पर सुट्टी..
सोमनाथ जंगम यांचा डॉक्टर ऑफ सोशल वर्क किताबाने सन्मान

श्रीरामपूर : श्रीकृष्ण हे अहिंसा, प्रेम, भक्ती, वीरत्व आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यांचे जीवनचरित्र सर्वश्रेष्ठ आहे. त्यांनी बलाढ्य क्रूरतेला हरवले आणि प्रेमाचे जग निर्माण केले.आई, गवळणी,निराधार महिला,भक्तगण यांचे रक्षण केले. सर्वसामान्य माणसाला जवळ केले.त्यांनी दूध, दही,लोणी,तूप खाऊन शरीर,मन बलिष्ठ केले. त्यामुळेच ज्या देशात, कुटुंबात स्त्रियांची, गाईंची पूजा, सुरक्षा आणि सन्मान होतो तो देश,परिवार पावन, पवित्र,समाधानी होतो.असे विचार ह.भ.प.दादा महाराज रंजाळे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील इंदिरानगर भागातील श्रीदत्त मंदिरात आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञात बोलत होते. बाबासाहेब यादव, लताताई यादव, योगेश यादव, ज्ञानेश्‍वरमाऊली मुरकुटे, डॉ. बाबुराव उपाध्ये, पत्रकार अ‍ॅड बाळासाहेब तनपुरे, ज्योतीताई तोडमल, मुख्याध्यापक भागवत मुठे पाटील,दादासाहेब पटारे आदिंनी रंजाळे महाराजांचे स्वागत, संतपूजन केले. रंजाळे महाराजांनी तीन तासांच्या भागवतकथा विवरणात मथुरालीला, द्वारकालीला, श्रीकृष्ण-रूक्मिणी विवाह सोहळा प्रसंग अत्यंत प्रभावीपणे सादर केले. कंसाच्या पापाचा अतिरेक झाला म्हणून श्रीकृष्णाने त्याचा अंत केला. सत्तेचा आणि द्वेष भावनेचा अतिरेक झाला की जगाच्या रक्षणासाठी त्यांचा शेवट केला पाहिजे.14 वर्षे आई,बापांपासून विरह दुःख सहन करून श्रीकृष्णाने प्रेम आणि हसून जीवन व्यतीत केले. वेदना आणि प्रार्थना जो अनुभवतो, तो देव होतो. जेथे प्रेम, विश्‍वास, भक्ती, निर्मळमन आणि सत्य तेथे विजय मिळतो, समाधान सापडते, असे विचारसूत्र अनेक प्रसंगातून रंजाळे महाराजांनी जणू साक्षात उभे केले.

COMMENTS