Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपने शेतकर्‍यांचे, युवकांचे अंगठे कापले ! : राहुल गांधी

नवी दिल्ली : ज्याप्रकारे द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापून त्यांचे भवितव्य अंधारात लोटले अगदी त्याचप्रकारे भाजप देशाील शेतकर्‍यांचा, युवकांचा

डॉ. बाबासाहेब आणि रमाबाई यांच्या एकत्र पुतळ्याने शहराच्या वैभवात वाढ – पालकमंत्री भरणे
कोण हा किरीट सोमय्या छोड दो पागल आदमी यहावहा घुमता है- संजय राऊत | LOKNews24
कामावरुन काढल्याचा असा काढला राग !

नवी दिल्ली : ज्याप्रकारे द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापून त्यांचे भवितव्य अंधारात लोटले अगदी त्याचप्रकारे भाजप देशाील शेतकर्‍यांचा, युवकांचा अंगठा कापून त्यांचे भवितव्य अंधारात ढकलत असल्याची घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी केली. गेल्या दोन दिवसांपासून संसदेत संविधानावर विशेष चर्चा सुरू आहे, यावेळी ते बोलत होते.
यावेळी राहुल गांधी यांनी संविधान आणि मनुस्मृतीची प्रत हातात धरून सभागृहाला दाखवत ते म्हणाले, देश मनुस्मृतीवर चालणार नाही. हजार वर्षांपूर्वी एकलव्याचा अंगठा ज्या प्रकारे कापला गेला होता. त्याचप्रमाणे आज देशातील केंद्र सरकार तरुण आणि गरिबांना त्रास देत आहे. अंगठ्यामुळे अभय मुद्रामध्ये आत्मविश्‍वास येतो. हे लोक विरोधात आहेत. जसा द्रोणाने एकलव्याचा अंगठा कापला, तसाच तुम्ही देशाचा अंगठा कापण्यात व्यस्त आहात. अदानीजींना धारावी देताना तुम्ही धारावीतील उद्योगपती आणि छोट्या व्यावसायिकांचा अंगठा कापलात. तुम्ही बंदरे, विमानतळ, संरक्षण उद्योग अदानीजींना दिलेत आणि सर्व प्रामाणिक उद्योगपतींचे अंगठे कापले. राज्यघटनेत लॅटरल एन्ट्री करून तुम्ही तरूण, मागासलेले आणि गरीबांचे नुकसान करत आहात. ज्याप्रमाणे एकलव्याने सराव केला होता, त्याचप्रमाणे भारतातील तरुण पहाटे 4 वाजता उठतात आणि परीक्षेची तयारी करतात. पूर्वी हजारो तरुण सकाळी उठून सैन्यात भरती होण्यासाठी धावत, प्रशिक्षण घेत असत. त्या तरुणांचे अंगठे पेपरलीक्सने कापलेत. दिल्लीबाहेर तुम्ही शेतकर्‍यांवर लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. तुम्ही अदानी-अंबानींना फायदा करून देता आणि शेतकर्‍यांचे नुकसान करता. आम्ही म्हणतो घाबरू नका, तुम्ही म्हणता आम्ही तुमचा अंगठा कापून टाकू, त्यामुळे इथला तरूण भयग्रस्त झाल्याची टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली.

आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडू
यावेळी बोलतांना राहुल गांधी म्हणाले आमची विचारधारा इंडिया आघाडीच्या विचारधारेने देशात संविधान आणले आहे. आपण सर्व मिळून संविधानाचे रक्षण करू. आज राजकीय समता संपल्याचे सर्वांना स्पष्ट झाले आहे. सर्व संस्था ताब्यात घेतल्या आहेत. सामाजिक-आर्थिक समानता नाही. कोणत्या लोकांचे अंगठे कापले गेले आणि कुठे हे आम्हाला दाखवायचे आहे. तुम्ही कोणाचा अंगठा कापला आहे, हे दलित, आदिवासी आणि शेतकर्‍यांना दाखवायचे आहे. याच संसदेत आम्ही जात जनगणना लागू करू, असे वचन दिले होते. आज आरक्षणाच्या मर्यादेची भिंत आम्ही पाडू असे आश्‍वासन देतो असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.

संविधान आपल्या देशाच्या संकल्पनेचा दस्तावेज
मी मागील काही भाषणांमध्ये अभय मुद्र्ा, निर्भयतेबद्दल बोलले. लोक संविधानाला जगातील सर्वात लांब लिखित दस्तऐवज म्हणतात. आपल्या देशाच्या आकलनाचा तो दस्तावेज आहे. संविधान उघडल्यावर आपल्याला आंबेडकर, गांधी, नेहरू यांचे विचार ऐकायला मिळतात. हे विचार येतात कुठून? हे आपल्या प्राचीन संस्कृती आणि सभ्यतेतून आले आहेत. हे शिव, गुरुनानक, बुद्ध, कबीर यांच्यापासून आले असल्याचा उल्लेख यावेळी राहुल गांधी यांनी केला.

COMMENTS