अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या जागेमध्ये नवीन व्यापारी संकुल उभारण्याबरोबरच जुने बांधकाम पूर्ण करून घेण्याचा व त्यास
अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या जागेमध्ये नवीन व्यापारी संकुल उभारण्याबरोबरच जुने बांधकाम पूर्ण करून घेण्याचा व त्यासाठी शिक्षक बँकेच्या सर्व सभासदांकडून निधी उभारण्याचा निर्णय काल विकास मंडळाच्या झालेल्या ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते घेण्यात आला.
विकास मंडळाच्या ४० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा ही वार्षिक सभा स्वतंत्रपणे घेण्यात आली. ती साडेतीन तास चालली .सभेचे अध्यक्ष स्थानी विकास मंडळाचे अध्यक्ष प्रदीप दळवी होते . यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नवनाथ दिवटे सचिव संतोष आंबेकर खजिनदार सुवर्ण राठोड यांचे सह सर्व विश्वस्त तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना व मंडळाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
प्रारंभी अध्यक्ष दळवी व सर्व विश्वस्तांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.प्रास्ताविक भाषणामध्ये अध्यक्ष प्रदीप दळवी यांनी विकास मंडळाच्या आजपर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला व विकास मंडळाच्या जागेमध्ये जे संकुलाचे अर्धवट बांधकाम उभे आहे त्याच्या ठेकेदाराने नोटीस देऊन न्यायालयात जाण्याचे सांगितले असल्याचे नमूद केले. तोच धागा पकडून उपस्थित सर्वच नेते मंडळींनी ही जागा आपल्या पूर्वजांची आहे . ती टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची आवश्यकता आहे असे सांगून शिक्षक बँके कडून प्रत्येक सभासदाचे दहा हजार रुपये प्रमाणे निधी विकास मंडळाकडे वर्ग करण्यासाठी बँकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याचा ही मनोदय व्यक्त केला.
विषय पत्रिकेवरील प्रथम तीन विषय हे सर्वानुमते मंजूर करण्यात आले . चौथ्या विषयावर मात्र तीन तास चर्चा झाली. चर्चेत भाग घेताना शिक्षक नेते संजय कळमकर यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत चिमटे काढले . बांधकामाबाबत सर्वांचे एकमत होते मात्र कृती होत नाही . मागच्यांनी घातलेले राडे आपल्याला निस्तरायची वेळ आली आहे असे सांगून सत्ताधाऱ्यांनी आपसातील घोळ मिटवावा . विश्वस्त व संचालकांनी एकत्र बसून अंतिम निर्णय घ्या . यासाठी आम्ही सहकार्य करायला तयार आहोत . या बांधकामाचा ठेकेदार कोण आहे हे आम्हाला अजूनही माहिती नाही . गाळे बांधताना मोठे बांधा . हॉस्पिटल सध्या मागे ठेवा . लगेच उत्पन्न कसे सुरु होईल असे पहा . या जिल्ह्यामध्ये शिक्षकी राजकारणामध्ये पाच-सहा नेत्यांचाच खेळ जिल्ह्यात चालतो . मागच्या वेळी नेमलेली कमिटी ही फक्त वेळ मारून नेण्यासाठी होती . त्यासाठी लोकही तयार नव्हते असे सांगून जिल्ह्यात होऊ घातलेली शिक्षकांच्या उपस्थितीची क्यू आर कोड प्रणाली आपण होऊ देणार नाही . राजेंद्र निमसे यांच्या पाठीशी सर्व जिल्हा आहे . लवकरच याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा होईल असे सांगितले .
शिक्षक नेते राजू शिंदे यांनी विकास मंडळाची स्वतंत्रपणे मीटिंग घेतल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे अभिनंदन केले . २०१३ पासून इमारत बांधकामाचा घोळ चालू आहे यामध्ये श्रेयवाद नडला . वास्तू पूर्ण होईपर्यंत विकास मंडळाची निवडणूक घेऊ नये असा अलिखित नियम करावा . फक्त स्टेजवर बोलून चालणार नाही तर कृती करण्याची गरज आहे . आवश्यकता भासल्यास बांधकामासाठी मी एक लाख रुपयाची ठेव देण्यास तयार आहे . शिक्षकांनी एक होण्याची गरज आहे असे सांगितले .
शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी सदरची जागा ही तमाम गुरुजींच्या मालकीची आहे . आता जागा जाते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे . आजच्या चर्चेत सर्वांनी सहभाग घेऊन चांगले पर्याय सुचवले . सर्व कारभार एकमताने होण्यासाठी मंजुरी दिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले . आपण यापूर्वी ठेवी गोळा करण्यास कधीही विरोध केला नाही . मात्र ठराविक लोकांच्या ठेवी अचानकपणे गोळा करण्याचं काम सुरू झालं होतं त्याला आपला विरोध होता . संकुल उभारणीच्या ठराव २०१६ साली मीच मांडला होता . सर्व सभासदांची समान रक्कम असावी असा आग्रह माझा आजही कायम आहे असे सांगितले .
शिक्षक नेते प्रवीण ठुबे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून जुन्या पिढीने जागा घेतली . ती टिकली पाहिजे . राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याची वेळ आता येऊ ठेपली आहे . नेत्यांमध्ये काही नसते कार्यकर्ते खालून पिना घालायचे काम करतात. बाकीच्या सर्व गोष्टी थांबवून हे काम प्राधान्याने करावे . सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा . सगळे अडथळे दूर करून निर्णय घ्या. जो योगदान देईल त्याला सभासद ठेवा असे सुचवले . यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षक नेते राजकुमार साळवे राजेंद्र ठोकळ अमित पन्हाळे एकनाथ दादा चव्हाण गणेश वाघ रघुनाथ झावरे संजय मस्के बबनदादा गाडेकर बाळासाहेब कदम सुरेश आबा दळवी रविकिरण साळवे सलीमखान पठाण संजय धामणे, धसाळ यांनी सहभाग घेतला.
सभेचे विषय विवेचन संतोष आंबेकर केले . सूत्रसंचालन मुकुंदराज सातपुते यांनी तर आभार नवनाथ दिवटे यांनी मानले .
सभेला विश्वस्त विलास गवळी संजय शेंडगे संतोष मगर प्रल्हाद भालेकर राजेंद्र निमसे बाळासाहेब गमे मुकुंदराज सातपुते चांगदेव काकडे गणेश गायकवाड दत्तू फुंदे दिलीप गंभीरे अनिता उगले मनीषा गाढवे उर्मिला राऊत सलीमखान पठाण व्यवस्थापक सुरेंद्र आढाव यांच्यासह शिक्षक नेते संतोष दुसुंगे गोकुळ कळमकर शरद भाऊ सुद्रिक राजेंद्र सदगीर गणेश मोटे अंबादास गारुडकर अमोल कलापुरे शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश गोरे माजी चेअरमन व विद्यमान संचालक संदीप मोटे कारभारी बाबर महेश भनभने कल्याण लवांडे गोरक्षनाथ विटनोर सूर्यकांत काळे राज्यसंघाचे नेते दत्ता पाटील कुलट गौतम साळवे आबा दळवी बाळासाहेब कापसे भास्कर कराळे बाबा आव्हाड शरद वांढेकर नारायण पिसे
गहिनीनाथ पिंपळे दत्ता सिनारे पंडित हजारे मनोज सोनवणे जयेश गायकवाड विठ्ठल काळे प्रकाश नांगरे नारायण पिसे जयदीप मोकाटे बाळासाहेब सालके संदीप सुंबे राहुल खराडे
जितू राहाटे श्याम पटारे चंद्रकांत पंडित निलेश राजवळ सचिन नाबगे नवनाथ भिसे राज गायके आदिसह सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS