कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावामध्ये संजयनगर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असुन येथे दरवर्षी जयंती सकाळी अभिवादन सभा,अन्नदान संध्याकाळी मिरवणूक अशा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते.
कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावामध्ये संजयनगर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असुन येथे दरवर्षी जयंती सकाळी अभिवादन सभा,अन्नदान संध्याकाळी मिरवणूक अशा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते.परंतु सध्या कोरोना या महामारी च्या पाश्र्वभुमीवर प्रशासनाने सार्वजनिक भीम जयंती संदर्भात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होउन संसर्ग वाढु नये यासाठी नियमावली तयार केली आहे त्यानुसार नियमांचे काटेकोर पालन करत भीम जयंती साजरी करावी असे आवाहन आर पी आय चे प्रदेश सचिव तथा स्मारक समितीचे अध्यक्ष दिपकराव गायकवाड यांचे वतीने करण्यात आले होते.या अवाहनाला प्रतिसाद देत भीम अनुयायांनी स्मारक परिसरामध्ये गर्दी न करता सामाजिक अंतर राखत टप्या टप्प्याने अभिवादन केले.सकाळी ठीक नऊ वाजता आर पी आय चे प्रदेश सचिव तथा स्मारक समितीचे अध्यक्ष दिपकराव गायकवाड,स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे,सहकार महर्षी शंकर कोल्हे सह.साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब वक्ते,शिवाजी, सनदी लेखा परीक्षक भास्करराव वकोडे,सरपंच सुवर्णा ताई पवार,उपसरपंच जलिंनदर चव्हाण, काँग्रेस चे तालुका सचिव चंद्रहार जगताप यांनी डॉ. बाबासाहेब यांचे स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.दिवस भरमध्ये त्यानंतर कल्याणराव गुरसळ, यशवंत आव्हाड,संजय भालेराव,दिलीप काकडे, बाळासाहेब पगारे,किशोर गायकवाड शिव सुत्र युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुधाकर वक्ते,विशाल गुरसाल,विकी चव्हाण यांच्या सह भीम अनुयायांनी टप्प्ाटप्प्याने अभिवादन केले दि. १३ एप्रिल रोजी सकाळी सागर गायकवाड,अविनाश पगारे,सागर जगताप, प्रवीण गायकवाड,अमोल काकडे , मंगल ताई आव्हाड यांनी स्मारक परिसरात साफ सफाई केली तर संध्याकाळी पिलू गायकवाड,राजू भालेराव, ठमा जगताप,संतोष चव्हाण,नितीन वाकोडे,साईनाथ गायकवाड,पंकज जगताप यांनी स्मारक व परिसरामध्ये सजावट केली.तर कुठल्याही परिस्थितीमध्ये गर्दी होऊन नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता व नियोजन ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गायकवाड,सुमित पगारे, संजय आव्हाड,पप्पू गायकवाड, यांनी केले.
COMMENTS