Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रात्रीतून 76 लाख मते कशी वाढली ? नाना पटोले

मुंबई : विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असतांनाच काँगे्रस नेते नाना पटोले यांनी रात्रीतून 76 लाख मते कशी वाढली? असा बोचरा सवाल नि

या जिल्ह्यातील बँकेवर चोरट्यांनी मारला डल्ला , एवढी रक्कम केली लंपास | LOK News 24
वेळीच आरक्षण न दिल्यास राज्यभर आंदोलने करु
सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यातून शिर्डी येथे जिल्हा पर्यटन माहिती केंद्र सुरू होणार
सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना महिन्याला 3 हजार रुपये देणार, नाना पटोलेंची  घोषणा | Nana Patole announced that he will give three thousand rupees to  his beloved sisters

मुंबई : विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असतांनाच काँगे्रस नेते नाना पटोले यांनी रात्रीतून 76 लाख मते कशी वाढली? असा बोचरा सवाल निवडणूक आयोगाला केला आहे. रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झाल्याचे निवडणूक आयोग सांगते. मतदान जास्त झाले असेल, तर त्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या असतील. निवडणूक आयोगाने त्या लागलेल्या लाईनचे आम्हाला व्हिडिओ द्यावेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. तसेच आयोगाने जी पारदर्शता पाळली पाहिजे ती पाळली नाही, असेही नाना पटोले म्हणाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद निवडणूक आयोगाने केली. तर रात्री 65. 2 टक्के मतदानाची नोंद आयोगाने केली. दुसर्‍या दिवशी 66 टक्के मतदाना झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. 76 लाख मतांची वाढ कशी झाली असा सवालही त्यांनी केला. मतदानाचे प्रमाण 7.50 टक्क्यांनी वाढले, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणीही पटोले यांनी यावेळी केली.

COMMENTS