Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत 271 मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना

राहाता : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिर्डी विधानसभा मतदारसंघात बुधवार 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वा

संघर्षमय व कृतीशील नेतृत्व हरपले – माजी आमदार आप्पासाहेब राजळे
केडगाव उपनगरामध्ये भरदिवसा बिबट्याचा हल्ला
शंभर टक्के लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान

राहाता : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिर्डी विधानसभा मतदारसंघात बुधवार 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 271 केंद्रांवर होणार्‍या या मतदान प्रक्रियेसाठी मतदान पथके पोलीस बंदोबस्तात रवाना झाली. मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथकांशी निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.
मनावर कोणतेही दडपण न घेता आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा सूचना आहेर यांनी केल्या. शिर्डी विधानसभा मतदारसंघात 108 ठिकाणी असलेल्या 271 मतदान केंद्रावर 1 हजार 600 अधिकारी-कर्मचार्‍यांचे मतदान पथकांना राहाता तालुका प्रशासकीय भवन येथे उभारण्यात आलेल्या 21 टेबलच्या माध्यमातून बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएमसह मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. 28 बसेस व 78 जीप मधून मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना झाले. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, बाळासाहेब मुळे, मनोज भोसेकर, मुख्याधिकारी वैभव लोंढे आदी उपस्थित होते. शिर्डी विधानसभा मतदारसंघात 8 उमेदवार निवडणूक लढवीत असून एकूण 2 लाख 92 हजार 911 इतके मतदार आहेत. यात 1 लाख 49 हजार 399 पुरूष मतदार आहेत. 1 लाख 43 हजार 504 स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथीय 8 मतदार आहेत. सेनादलातील 241 मतदार आहेत. मतदानादिवशी पहाटे साडेपाच वाजता सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोलची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी 7 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल. मतदान प्रक्रियेत मतदारांना सहकार्य व्हावे म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची सुविधा असणार आहे. वेटींग रुम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत पुरवठा आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. एनएसएस व एनसीसीचे 18 वयापेक्षा कमी वयाच्या स्वयंसेवकांची नेमणूका करण्यात आल्या आहेत.

सुमारे 800 सुरक्षा कर्मचार्‍यांची नियुक्ती
मतदान केंद्रांवरील सुरक्षाकामी सुमारे 400 पोलीस कर्मचारी व 400 केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल (सीएमपीएफ) च्या कर्मचार्‍यांची सुरक्षा व्यवस्थेकामी नियुक्ती करण्यात आली आहे.शिर्डी विधानसभेतील प्रत्येक बुथवर गरजेनुसार 2 सुरक्षा कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. 11 पथकांच्या माध्यमांतून पेट्रोलिंग केली जाणार आहे.

मतदान केंद्रांच्या हालचालींवर बारीक लक्ष
शिर्डी विधानसभेतील 271 मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्राचे लाईव्ह वेबकॉस्टींग करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील पडद्यावर (स्क्रीनवर) ही लाईव्ह वेब कास्टिंगच्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर रोजी 2024 रोजी सकाळी 5.30 वाजेपासून राखीव कर्मचार्‍यांची टीम क्षणा-क्षणाला मतदान केंद्रावरील हालाचालींवर बारीक लक्ष ठेवणार आहेत. मतदारांनी मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी घेऊन जावू नये. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपला मताचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावे, असे आव्हान. आहेर यांनी केले आहे.

COMMENTS