Homeताज्या बातम्यासंपादकीय

सर्वाधिक जागा लढविणारे पक्ष, सत्तेच्या नव्हे, अस्तित्वाच्या संघर्षात!

महाराष्ट्र हा सौम्य नव्हे; तर, समतेचा प्रदेश आहे! या राज्यामध्ये सामाजिक परिवर्तनाचा इतिहास लोकांच्या मनात खोलवर रुजलेला आहे. हा इतिहास किती खोलव

 महाराष्ट्रात सर्वात आधी शरद पवार यांनी गद्दारीचं बीज रोवला  – खा. प्रतापराव जाधव 
चक्क! BJP नगरसेवकाला नागरिक नडले | LOKNews24
वीज कोसळून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू l पहा LokNews24

महाराष्ट्र हा सौम्य नव्हे; तर, समतेचा प्रदेश आहे! या राज्यामध्ये सामाजिक परिवर्तनाचा इतिहास लोकांच्या मनात खोलवर रुजलेला आहे. हा इतिहास किती खोलवर लोकांच्या मनात रूजलेला आहे, याची साक्ष कोणत्याही ऐतिहासिक उदाहरणाने न देता, ज्यांनी नुकताच वर्षभरापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे त्या अशोकराव चव्हाण यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेला विरोध केला. यापूर्वी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांनी देखील या गोष्टीला विरोध केला आहे. महाराष्ट्रातील स्थिती पक्षनिहाय विचारांची केली तर, प्रत्यक्षात नेत्यांनी दिलेला नकार,  त्यांचा वैयक्तिक नसून महाराष्ट्रातील समाज मनाचे ते प्रतिबिंब आहे! हे प्रतिबिंब वैचारिक आहे.  समतेच्या प्रवाहाचा खोल रुजलेला भाग प्रदर्शित करणारे आहे. महाराष्ट्र हा कधीही एकांगी राहिलेला नाही. मात्र, राजकीय लढ्यामध्ये अशा प्रकारच्या घोषणा जेव्हा येतात, तेव्हा जनतेमध्ये विभाजन करण्याचा उद्देश राजकीय पक्षांचा असू शकतो. परंतु, प्रत्यक्षात जनता मात्र ही विभाजित होण्यास तयार नसते. वर्षानुवर्षी जुळलेली मने एखाद्या विखारी घोषणेनं विभक्त होत नाही. याउलट, त्यावर आणखी मंथन करून महाराष्ट्र नव्या दिशेने वाटचाल करतो, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होत असताना, विखारी घोषणा येत आहेत किंवा त्यांचा वापर होतो आहे. परंतु, महाराष्ट्रातील जनता मात्र त्या विखारी घोषणांचा स्वीकार करायला तयार नाही. याची एक प्रकारे पावती, भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे आणि भाजपात वर्षभरापूर्वीच प्रवेश केलेले अशोक राव चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यातून दिसून येतो. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या अतिशय शिगेला आल्या आहेत. २० नोव्हेंबर ला होणाऱ्या मतदानातून महाराष्ट्राची जनता व्यक्त होईल. यादरम्यान, काही सर्वे आलेले आहेत. या सर्वेमधून महाराष्ट्राची जनता ही एक संघ राहणार असल्याची किंबहुना महाराष्ट्रातील मुद्द्यांवर आधारित मतदार व्यक्त होतील, असा अंदाजही लोकपालच्या सर्व्हेने व्यक्त केला आहे. याचा अर्थ, महाराष्ट्राचा हा सर्वे लोकांच्या विचारांचं आणि मानसिकतेच निदर्शन करणारा आहे. यात शंका नाही. विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका यांच्यामधील अंतर महाराष्ट्रातील मतदाराला निश्चित समजते. तरीही लोकसभेत असलेला पॅटर्न किंवा मतदारांचा कल हा विधानसभेतही थोड्याफार फरकाने तसाच राहील, असा व्यक्त झालेला अंदाज हे महाराष्ट्राच्या जनतेचे मानसिक विश्लेषण आहे! अशी एक बाब दिसते. परंतु, दुसऱ्या बाजूला महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाडीमध्ये तीव्र लढत असली तरी, या व्यतिरिक्त अनेक पक्ष जे मैदानात आहेत, त्यामध्ये उल्लेख करावा असे असलेले पक्ष  प्रहार पार्टी, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पक्ष. या पक्षांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उमेदवार दिले आहेत. अर्थात, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उमेदवार देणारे पक्ष म्हणून बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांचा उल्लेख करता येईल. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा लढून बहुजन समाज पक्ष आपली मतांची टक्केवारी टिकवू पाहतो आहे; तर, वंचित बहुजन आघाडी आपली राजकीय मान्यता निर्माण करण्यासाठी किमान २०० उमेदवार देऊन मैदानात आहे. अर्थात, या दोन्हीही पक्षांची लढाई ही सत्तेसाठी दिसत नाही! कारण, यांची लढाई ही मतांची टक्केवारी वाढवणे आणि आपल्या पक्षाची मान्यता रद्द होण्यापासून वाचवणे किंवा मिळवणं अशा प्रकारचे आहेत.  सत्तेच्या लढाईत कमी आणि अस्तित्वाच्या लढाईत अधिक आहेत. तर, दुसऱ्या बाजूला दोन राष्ट्रवादी काँग्रेस, दोन शिवसेना आणि यांच्यामध्ये एक असणारी काँग्रेस, तरीही  काँग्रेसला या निवडणुकीत योग्य तितक्या जागा लढवता आल्या नाहीत. मोठ्या पक्षांच्या दृष्टीने विचार केला तर तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार हे भारतीय जनता पक्षाने मैदानात उतरवले आहेत. १४९ उमेदवार मैदानात उतरवून त्यांनी सिंगल लार्जेस्ट पार्टी बनण्याच्या दिशेने आपली वाटचाल केल्याचे दिसते. परंतु, २० तारखेला मतदान, २३ तारखेला मतमोजणी होईल. त्यानंतर, अवघे दोनच दिवस सत्ता स्थापनेसाठी असल्याने सर्वच राजकीय आघाड्या त्या दृष्टीने निवडणुकीआधीच बऱ्याचशा तयारीत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर, दोन दिवसात कोणतेही सरकार असते तर आले नाही, तर, निश्चितपणे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची संभावना नाकारता येत नाही.

COMMENTS