Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विमा कपंनीच्या प्रतिनिधींनी पैशांची मागणी केल्यास तक्रार करा : भाग्यश्री फरांदे

सातारा / प्रतिनिधी : कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरात फळपीकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपीकांचे बाजारमुल्य अधिक असल्याने शेतकर्‍यांना चांगले उत्पन

पालिकेच्या अग्नीशमन केंद्रावर गाड्या धुण्याचे सेंटर सुरू : विक्रमभाऊ पाटील
अविचारी राजकारण करणार्‍या नेतृत्वाला मतदार धडा शिकवेल : निशिकांत भोसले-पाटील
शिवशाही सरपंच संघाकडून स्व. शिवाजीराव देसाई आदर्श ग्रामसह आदर्श सरपंच पुरस्कार

सातारा / प्रतिनिधी : कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरात फळपीकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपीकांचे बाजारमुल्य अधिक असल्याने शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र, फळपीकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकर्‍यांच्या फळ पीकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देऊन त्यांचे अर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी पुर्नरचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. विमा कंपनी प्रतिनिधी पडताळणी करण्यास आल्यास संबंधित शेतकरी यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा. विमा कंपनी प्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी केल्यास तात्काळ तक्रार द्यावी. अशा विमा कंपनी प्रतिनिधी/कंपनीवर फौजदारी कारवाई करणेत येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.
या योजनंतर्गत गत 3 वर्षांमध्ये भाग घेतल्यापैकी सुमारे 29 हजार बोगस अर्ज आढळून आले आहेत. त्याअनुषंगाने प्रधान सचिव यांनी मृग बहार 2024 मधील 100 टक्के सहभागी अर्जाची क्षेत्रीय अधिकारी/कर्मचार्‍यांमार्फत तपासणी करुन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. प्रधान सचिवांच्या आदेशानुसार मृग बहार 2024 मधील सर्व बागांची पडताळणी कृषि विभागाने केली आहे. विमा कंपनी प्रतिनिधी शेतावर अथवा निवासस्थानी जाऊन शासनाच्या आदेशानुसार फळबागेची पडताळणी करण्यास आल्याची बतावणी करत आहे. आपल्या फळबागेबाबत माझा अहवाल गेल्याशिवाय नुकसान भरपाई मिळणार नसल्याची भिती दाखवून शेतकर्‍यांकडून उकळत असल्याचे निदर्शनास आले आहे. या विमा कंपनीच्या प्रतिनिधीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अशा प्रकारचे विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी मागणी केल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी.

COMMENTS