Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवाब मलिकांच्या अडचणी पुन्हा वाढणार ;जामीन रद्द करण्यासाठी ईडीकडून याचिका

मुंबई :वैद्यकीय जामीनावर असलेले राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण त्यांची प्र

वंचितांना ऊबदार ब्लँकेट, कपडे व फराळचे वाटप
मनात भीती न ठेवता नियमित आरोग्य तपासणी करणे ही काळाची गरज – नमिता मुंदडा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वी करावी

मुंबई :वैद्यकीय जामीनावर असलेले राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण त्यांची प्रकृती चांगली असून त्यांचा वैद्यकीय जामीन रद्द करावा, अशी मागणी ईडीने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजपचा विरोध असताना देखील अजित पवारांनी नवाब मलिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नवाब मलिक यांचे दाऊदसोबत संबंध असल्याचे आरोप भाजपने केले होते. तसेच त्यांना अटक देखील करण्यात आली होती. असे असून देखील महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवाब मलिक यांनी प्रवेश केला. एवढेच नव्हे तर अजित पवारांनी नवाब मलिक यांना उमेदवारी देखील जाहीर केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये या विषयावरुन मतभेद असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सध्या मलिक हे जामिनावर बाहेर आहेत. त्यात आता त्यांचा जामिनच रद्द करण्याची मागणी ईडीच्या वतीने करण्यात आली आहे.

COMMENTS