Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात येणारे मोठे उद्योग गुराजतला कसे गेले : राजवर्धन पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : आपल्या राज्यातील लाखो युवकांच्या हाताला काम देणारे अनेक मोठ-मोठे उद्योग गुजरातलाच कसे गेले? याचा विचार आपल्या राज्यातील

कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे 10 तारखेला उपोषण : अशोकराव पाटील
किल्ले अजिंक्यतारा येथे शाहु महाराज राज्यभिषेक दिन साजरा
व्यापार्‍याच्या मुलाच्या अपहरणात चौघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई

इस्लामपूर / प्रतिनिधी : आपल्या राज्यातील लाखो युवकांच्या हाताला काम देणारे अनेक मोठ-मोठे उद्योग गुजरातलाच कसे गेले? याचा विचार आपल्या राज्यातील जनता निश्‍चितच करत आहे. भाजपा महायुतीच्या सरकारने मोदी-शहा आणि गुजरातचे मांडलिकत्व पत्करल्याने महाराष्ट्र राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप युवा नेते राजवर्धन पाटील यांनी इस्लामपूर येथील सभेत बोलताना केला. आ. जयंत पाटील यांचा विजय निश्‍चित असून राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर शहरातील मंत्री कॉलनी, बुरुड गल्ली, रामोशी गल्ली व शास्त्रीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर कोपरा सभेत ते बोलत होते.
राजवर्धन पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटून इतिहास घडविला. मात्र, भाजपाने शिवसेनेचे आमदार फोडून त्यांना सुरतला नेले आणि मराठी माणसाने उभा केलेला पक्ष फोडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला. राज्यातील जनतेने त्यांना लोकसभा निवडणुकीत हिसका दाखविला. ही दोन व्यक्तींमधील लढाई नसून दोन विचारांची लढाई आहे. समोरच्या बाजूला गुजरात धार्जिण्य, पक्ष बदलू, गद्दार आहेत. आपल्या बाजूला विचार, तत्व, स्वाभिमानाचे तसेच महाराष्ट्र व सामान्य माणसाच्या हिताचे राजकारण करणारे नेते आहेत. शेवटी विजय सत्याच होतो.
शहाजी पाटील, पै. भगवान पाटील, शकील सय्यद, सौ. अरुणादेवी पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, दादासाहेब पाटील, अ‍ॅड. धैर्यशिल पाटील, गजानन पाटील, उदय सरनोबत, सुशांत कुर्‍हाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

COMMENTS