Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाचकांकडून वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान

इस्लामपूर / प्रतिनिधी : गेली 25 वर्षापासून ऊन, वारा, पाऊस, थंडीची पर्वा न करता वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचविण्याचे काम करणारे कापूसखेड, ता. वा

कायचिकित्सा विषयात एलआरपी आयुर्वेद मेडिकल कॉलेजचा मंगेश तपकीर राज्यात प्रथम
पांचगणी पालिका मुख्याधिकार्‍यांच्या अंगावर काळा रंग टाकून हल्ला
राष्ट्रीय महामार्गावर धारधार शस्त्रासह एकास अटक

इस्लामपूर / प्रतिनिधी : गेली 25 वर्षापासून ऊन, वारा, पाऊस, थंडीची पर्वा न करता वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचविण्याचे काम करणारे कापूसखेड, ता. वाळवा येथील वृत्तपत्र विक्रेते सुरेश किसन माळी यांचा वाचकांनी खास सन्मान केला. येथील सद्गुरू सार्वजनिक वाचनालयातील वाचकांनी एकत्रित येत हा सन्मान केला. यावेळी माळी यांना थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांना स्वेटर, कानटोपी, हातमोजे देण्यात आले.
इंद्रप्रस्थ पतसंस्थेचे संचालक बी. आर.पाटील, भगवान जाधव, सुदाम मोकाशी, महादेव माळी, माजी मुख्याध्यापक भारत मोकाशी, दिपक पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
भारत मोकाशी म्हणाले, जगात चाललेल्या घडामोडी केवळ विश्‍वासार्ह पध्दतीने वृत्तपत्रेच देऊ शकत आहेत. याप्रमाणेच वृत्तपत्र विक्रेत्यांचे आपल्या रोजच्या आयुष्यातही एक महत्वाचे स्थान आहे. आपण झोपेतून उठण्यापूर्वी रोजच्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे पहाटेच आपल्या घरापर्यंत पोहचवण्याचे काम अविरतणे करत असतात.
यावेळी दिनकर मोकाशी, लक्ष्मण पाटील, प्रकाश देसाई, सुहास धुमाळे, राजेंद्र माळी, शहाजी धुमाळे, विनायक धुमाळे, जयवंत गुरव, जितेंद्र पाटील, सुरज माने, प्रशांत धुमाळे, सुशांत धुमाळे, संकेत धुमाळे आदींसह वाचक उपस्थित होते. दिपक पाटील यांनी स्वागत केले. प्रशांत धुमाळे यांनी आभार मानले.

COMMENTS