पदोन्नतीतील आरक्षणासाठी आरपीआयचा आंदोलन सप्ताह

Homeताज्या बातम्याअहमदनगर

पदोन्नतीतील आरक्षणासाठी आरपीआयचा आंदोलन सप्ताह

पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने आंदोलन सप्ताह करण्यात येणार आहे.

एलआयसीच्या एमडीआरटी पुरस्काराने कल्पना लवांडे सन्मानित
Ahmednagar : आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन | LOKNews24
पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी- पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने आंदोलन सप्ताह करण्यात येणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जून ते 7 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

    अहमदनगर जिल्ह्यात देखील शहर व तालुकास्तरावर आंदोलन केले जाणार असून, जिल्ह्यातील आरपीआयचे कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रसिध्दीप्रमुख अमित काळे यांनी दिली. जिल्ह्यात होणारे आंदोलन आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष आणि अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. हे आंदोलन कोरोनाचे नियम पाळून गर्दी न करता होणार आहे. जिल्ह्यातील सर्व आरपीआयच्या कार्यकर्ते व तालुकाध्यक्षांना आपल्या तालुक्यातच आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याच्या मागणीसाठी आरपीआयने आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकार स्वतःला पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नतीमधील मागसावर्गीयांच्या आरक्षण प्रश्‍नी महाविकास आघाडीचा बुरखा फाटला आहे. महाविकास आघाडी सरकार हे दलितविरोधी सरकार ठरल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.

COMMENTS