Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कलाक्षेत्रात चांगले गुरु करा व अफाट कष्ट करा : प्राचार्य डॉ.मोहन राजमाने

सातारा : युवा महोत्सवात पहिला, दुसरा नंबर येण्याची मनीषा न बाळगता अतिशय चांगली सादरीकरण करावे. सर्वात जास्त शुटींग सातारा जिल्ह्यात चालू असते. ला

छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा नौदलाच्या ध्वजावर.
रामनवमी निमित्त वर्ध्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन 
फालुदा खाल्याने कोतुळमध्ये अनेकांना विषबाधा

सातारा : युवा महोत्सवात पहिला, दुसरा नंबर येण्याची मनीषा न बाळगता अतिशय चांगली सादरीकरण करावे. सर्वात जास्त शुटींग सातारा जिल्ह्यात चालू असते. लागीर झाले जी,पारू या सारख्या मालिका याच परिसारत तयार झाल्या.या मालिकेत जायची संधी कलावंताना नक्की मिळेल. युवा महोत्सवात धाडस निर्माण व्हावे .युवा महोत्सव ही एक संधी आहे तिचा फायदा घ्यावा. कलेच्या क्षेत्रात काम करायचे असेल तर चांगले गुरु करा, अफाट कष्ट तयार करावे लागेल’’ असे मत सदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडचे प्राचार्य डॉ.मोहन राजमाने यांनी व्यक्त केले. ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या द्वितीय महोत्सवाचे उद्घाटन करताना छत्रपती शिवाजी कोलेज मध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के हे उपस्थित होते. यावेळी अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत काम करणारे अभिनेते संतोष पाटील, सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव अरुण सपकाळ,विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ.विजय कुंभार,यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ.बी. टी. जाधव, रयत शिक्षण संस्थेच्या ऑडीट विभागाचे सहसचिव डॉ.राजेंद्र मोरे, डी.जी.कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्ही.के सावंत,विद्यार्थी विकास मंडळाच्या डॉ.मनीषा पाटील, सांस्कृतिक समन्वयक राजेंद्र संकपाळ, विद्यापीठाच्या विविध विभागाचे अधिष्ठाता डॉ.अनिलकुमार वावरे, प्रा.डॉ.आर.आर.साळुंखे, डॉ.डी.डी.नामदास, डॉ. धनाजी जाधव, डॉ. महानवर, प्रा. डॉ.सुभाष वाघमारे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
कुलगुरू प्रा.डॉ.ज्ञानदेव म्हस्के अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की ‘विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होण्यासाठी त्यांना कलेची आवश्यकता आहे. रयतेचा केंद्रबिंदू हा कधीही विद्यार्थीच राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या इच्छा आणि आकांक्षा फलद्रूप होण्यासाठी आपण युवा महोत्सवाचे काम करतो. विद्यार्थ्यांनी सदर केलेली कला अबोध ,दुर्बोध असू नये तर सुबोध असावे,. सळसळती तरुणाई ही रचनात्मक काम करण्यासाठी असावी. सळसळणे हे सापाचे देखील असते, पण विधायक कृती करण्यासाठी विद्यार्थ्यांची सळसळ असायला हवी असे ते म्हणाले. विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अनेक अनुयायी आहे. ग्रामगीता त्यांनी लिहिली असली तरी ऐहिक गरजांची पूर्तता महत्वाची आहे. सिंधुताई यांच्याकडून नाळ तोडण्याचा प्रसंग ऐकतांना करूणआणि बीभत्स रस मनात निर्माण केला . माई यांनी तरुणांच्या पुढे देखील पदर घेऊन दाखवला होता .बहुआविष्कार त्या करीत होत्या ,समयोचित बोलत होत्या असेही ते म्हणाले. या युवा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी प्रथम प्रास्ताविक डॉ. मनीषा पाटील यांनी व्यक्त केले.प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांचा परिचय प्रा.डॉ.रोशनआरा शेख यांनी करून दिला. युवा महोत्सवाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. शेवटी प्रा. डॉ.रामराजे माने देशमुख यांनी मानले. सूत्र संचालन प्रा.राजेंद्र तांबिले व डॉ.विद्या नावडकर यांनी केले. या समारंभास विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने हजर होते.

COMMENTS