Homeताज्या बातम्याशहरं

दोन मुलींना कंबरेला बांधून विवाहितेची आत्महत्या

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील धामणी या गावात सौ. ऐश्‍वर्या स्वप्निल चव्हाण (वय 25) या विवाहित महिलेने आपल्या दोन मुलींना कमरेला ब

आयटी पार्क खोटच आहे म्हणूनच आमदारांनी किरण काळें समोर खुल्या चर्चेला येण्यापासून पळ काढला
ओम कदम याला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक
कामावर हजर होणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना अडवू नका; अन्यथा गुन्हे दाखल करू

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील धामणी या गावात सौ. ऐश्‍वर्या स्वप्निल चव्हाण (वय 25) या विवाहित महिलेने आपल्या दोन मुलींना कमरेला बांधून तलावात उडी टाकून आत्महत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सहा वर्षांपूर्वी स्वप्निल बापूराव चव्हाण (वय 30) यांचा ऐश्‍वर्या हिच्या समवेत कराड येथे विवाह झाला होता. त्यानंतर ते माण तालुक्यातील चव्हाण वस्ती येथे राहत होते. स्वप्नील हा गवंडी काम करून आपली पत्नी व तीन मुलींचा सांभाळ करत होता. सोमवार दि. 21 रोजी पत्नी ऐश्‍वर्या स्वप्नील चव्हाण मध्यरात्री घराशेजारी असलेल्या तलावात कु. स्वरांजली (वय 6) व कु. शिवानी (वय 3 महिने) दोन्ही मुलींना कमरेला बांधून तलाव्यात उडी टाकून आत्महत्या केली. तीन वर्षाची तिसरी मुलगी ही आजीजवळ झोपली होती. तीन मुलींना बरोबर घेऊन जाता आले नाही म्हणून ती वाचली. या घटनेमुळे माण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पती स्वप्नील बापूराव चव्हाण यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर मसवड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि सखाराम बिराजदार करत आहेत.

COMMENTS