Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मला चळवळीतून संपवण्याचा डाव : मनोज जरांगे

जालना : मला चळवळीतून संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी केंद्र अन् राज्यातील एका नेत्याला ताकद दिली गेली, असा आरोप शनिवारी मराठा आरक्षणाचे नेत

टीईटी घोटाळाप्रकरणी माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा पाय खोलात
प्रियकराने प्रेयसीसह स्वतःला घेतले पेटवून
राज्यात दोन उपसरपंच पद्धत लागू करा

जालना : मला चळवळीतून संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी केंद्र अन् राज्यातील एका नेत्याला ताकद दिली गेली, असा आरोप शनिवारी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी सरकारवर केला. गरज पडल्यास या नेत्यांच्या नावाची समाजापुढे चिरफाड करू, असा इशाराही त्यांनी दिला.
आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज निर्णायक मतदान करतील. आता रणशिंग फुंकले आहे. लढाईला उतरायचे म्हणजे तलवार काढावीच लागेल, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. ही निवडणूक लढवायची की मराठा आरक्षणाला विरोध करणारे आमदार पाडायचे याचा निर्णय उद्याच्या बैठकीत घेतला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. मनोज जरांगे यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 20 ऑक्टोबर रोजी आंतरवाली सराटीत होणार्‍या मराठा समाजाच्या बैठकीची माहिती दिली.

COMMENTS