Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभेला ताकद दाखवून देवू : मनोज जरांगे

जालना : राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण लागू होईल अशी अपेक्षा होती, मात्र देवेंद्र फडणवीसांनी मराठयांचा कार्यक्रम केला.

बालाजीला केस अर्पण करणे पडले महागात, नोकरी गेली
सचिव भांगेंच्या कृपाशीवार्दा मुळे बार्टीच्या महासंचालकांचा बेभान डान्स
तुम्हाला तुमच्या जन्मदात्याचा अभिमान नाही, ही कुठली संस्कृती ?

जालना : राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण लागू होईल अशी अपेक्षा होती, मात्र देवेंद्र फडणवीसांनी मराठयांचा कार्यक्रम केला. आता विधानसभा निवडणुकीत त्यांची जिरवायची, लोकसभेपेक्षा जास्त ताकद दाखवून देवू असा इशाराच मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच कुणाच्या जागा वाढवायच्या आणि कुणाच्या कमी करायच्या हे आम्ही ठरवू असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, मराठ्यांना बेदखल करण्याचे काम फडणवीस यांनी केले. कष्टकरी, कामगार, शेतकरी यांना जी अपेक्षा होती ती आशा सरकारने संपवली. मराठ्यांचे आयुष्य बेचिराख करण्याचे काम फडणवीस यांनी केले. फडणवीसांनी सत्तेचा वापर मराठ्यांच्या विरोधात केला. मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही यासाठीच फडणवीसांनी सुरुवातीपासून खेळी केली. या मराठ्यांची पोरे आरक्षणापासून, शिक्षणापासून, नोकरीपासून वंचित राहीले पाहिजेत अशा पद्धतीनेफडणवीस मराठ्यांसोबत वागले. सामाजिक चळवळीत वैचारिक मतभेद असू शकतात पण मराठा समाज एक ठेवायचा नाही, मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता भिकारी ठेवण्याचे काम फडणवीस यांनी केले, ते मराठा समाजासोबत त्वेषाने वागले अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. मराठ्यांना फडणवीस यांची खुन्नस कळाली होती. आम्ही मराठ्यांना बाजूला ठेऊन सत्तेवर बसू असे फडणवीसांनी ठरवले. फडणवीस आम्हाला आरक्षण देतील असा आम्ही विश्‍वास ठेवला होता. शेवटी त्यांनी बरबटलेले विचार त्यांनी बाहेर आणलेच. मराठ्यांना बाजूला ठेवण्यासाठी फडणवीस यांनी डाव रचले. त्यांच्या 17 पिढ्या आल्या तरी मराठ्यांना बाजूला ठेऊन ते सत्तेवर कधीच येऊ शकत नाही. इथे सर्व जातींचा प्रश्‍न आहे. हात जोडून सर्व समाजाला विनंती करतो, आपल्या समाजाला बळ द्यायचे काम करा. यावेळी मराठ्यांचे 100 टक्के मतदान झाले पाहिजे. मराठ्यांचे एकही मतदान घरी राहता कामा नये, असे आवाहन देखील जरांगे यांनी यावेळी केले आहे.

COMMENTS