Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशाची दशा आणि दिशा बदलणारी निवडणूक

भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचे प्रतिपादन

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अतिशय महत्वाची असून ही निवडणूक देशाची दिशा आणि दशा बदलणारी असेल असा विश्‍वास भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा

गोदावरी तीरी संत श्रेष्ठ गोरोबाकाका मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न
समृद्धी महामार्ग विकासाचा ‘गेमचेंजर’ ठरेल – मुख्यमंत्री शिंदे
समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अतिशय महत्वाची असून ही निवडणूक देशाची दिशा आणि दशा बदलणारी असेल असा विश्‍वास भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी व्यक्त केला. मंगळवारी मुंबईत भाजप पदाधिकार्‍यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकार्‍यांना आपल्या भाषणाची व्हिडिओ व ऑडिओ रेकॉर्डिंग न करण्याचाही सल्ला दिला.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौर्‍यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अजूनही महायुतीमध्ये जागावाटप झालेले नाही. त्याचपार्श्‍वभूमीवर शहा यांचा हा दौरा विशेष मानला जातो. यावेळी बोलतांना शहा म्हणाले की, भाजप नेहमीच सामान्य कार्यकर्त्यांना संधी देते. मी सामान्य कार्यकर्त्यापासून भाजपच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. त्यामुळे मला कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नेहमीच आनंद होतो. काही निवडणुका देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात. हे मी माझ्या अनुभवाने सांगत आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही तशीच आहे. या निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणाची दिशा अन् दशा बदलेल. कारण, मागील 60 वर्षांत कोणताही राजकीय पक्षाला सलग 3 वेळा जिंकण्याची कामगिरी करता आली नाही. निवडणुकीच्या निमित्ताने मी देशभर फिरत आहे. सगळीकडे झारखंड किंवा हरयाणात काय होणार? असे कुणीही विचारत नाहीत. केवळ महाराष्ट्रात काय होणार? असा प्रश्‍न विचारतात, असे नमूद करत अमित शहा यांनी यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून महाराष्ट्रात काय होणार? असा प्रश्‍न केला. त्यावर कार्यकर्त्यांनी आपण जिंकणार असा पुकारा केला. तसेच महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येणार असा विश्‍वासही व्यक्त केला. शहा पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आपल्या 2 जागा निवडून आल्या असतानाही आपला एकही कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नव्हता. हा आपल्या पक्षाचा इतिहास आहे. 80 च्या दशकातील सर्वच कार्यकर्त्यांना आपला पराभव होणार हे माहिती होते. पण त्यांची त्यांना कोणतीही तमा नव्हती. आपण राजकारणात पंतप्रधान किंवा इतर कोणत्याही पदासाठी नव्हे तर महान भारताच्या रचनेसाठी आलोत अशी त्यांची भावना होती. सरकार येते आणि जाते. आपले सरकार 10 वर्षे चालले, पण आपण आपला विचार केव्हाच सोडला नसल्याचे देखील त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले.

निराशेला गाडून कामाला लागा
यावेळी अमित शहा यांनी काँगे्रस नेते राहुल गांधी यांच्यावरही कठोर टीका केली. शहा यावेळी म्हणाले की, राहुल गांधी यांनी आतापर्यंत किती निवडणुका जिंकल्या? एखाद्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला 85 टक्के गुण मिळाले, पण नेहमी 20 टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्याला 30 टक्के गुण मिळाले, तर तो विद्यार्थी गावभर मिठाई वाटतो. राहुल गांधी असा मूर्खपणा करत आहेत. विजयी होणाराच सरकार स्थापन करतो. त्यामुळे निराशेला गाडून कामाला लागा. महाराष्ट्रात भाजप महायुतीचे सरकार येईल असा विश्‍वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला.

COMMENTS