Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सयाजीराव पोखरकर यांना राज्य सरकारचा कृषीभूषण पुरस्कार

अकोले : महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणार्‍या विविध कृषी पुरस्कार वितरणाचा सोहळा येत्या रविवारी मुंबईतील वरळी येथील एन.एस.सी. आय

पाथर्डी तालुक्यात पावसाने हजेरी ; बळीराजा सुखावला
सुरेगाव सोसायटी बँक पातळीवरील शंभर टक्के वसुली
प्रत्येक कुटुंबांने एक झाड लावून ते वाढवावे

अकोले : महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणार्‍या विविध कृषी पुरस्कार वितरणाचा सोहळा येत्या रविवारी मुंबईतील वरळी येथील एन.एस.सी. आय केंद्रात संपन्न होत असून राज्याचे राज्यपाल महामहीम सी.पी.राधाकृष्णन यांचे शुभहस्ते सदरचा पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळी अकोले तालुक्यातील कोतूळ येथील कृषीतज्ज्ञ व प्रयोगशील शेतकरी सयाजीराव पोखरकर यांनी शेती क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना या मानाच्या वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
 श्रपोखरकर हे स्वतः एम.एस्सी.अ‍ॅग्री असून त्यांचा कोबी, टोमॅटो, आद्रक या भाजीपाला पिकांबरोबरच झेंडू, शेवंती, बिजली या फुल पिकांचा आणि ऊस शेतीचा विशेष अभ्यास आहे. इस्रायल आणि जॉर्डन या देशांचा शेतीविषयक अभ्यास दौरा त्यांनी पूर्ण केला आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांच्या अनेक मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत. शेती क्षेत्रात चर्चासत्रे, प्रशिक्षण शिबिरे, शेतकरी मेळावे, प्रक्षेत्र भेटींच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसाराचे तसेच कृषी विस्ताराचे मोठे काम त्यांनी केले आहे. सहकारी दूध संस्था, सामाजिक, सांस्कृतिक आणि शेती क्षेत्रातील संस्थांमध्ये त्यांचा निकटचा संबंध आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता महिला कृषीभूषण, सेंद्रिय शेती कृषीभूषण, शेती मित्र व शेतीनिष्ठ शेतकरी तसेच डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सेवा रत्न या पुरस्कारांबरोबरच पीक स्पर्धा विजेत्यांचा यामध्ये समावेश आहे. पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये रोख, सुवर्णपदक, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र अशा प्रकारचे आहे. सन 2020-2023 या तीन वर्षातील प्रलंबित पुरस्कार यावेळी एकत्रित वितरित करण्यात येणार असून पुरस्कारार्थींचा सपत्नीक सत्कार सोहळा येत्या रविवारी पार पडणार आहे

COMMENTS