Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बस नं. 1532 एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक

पुणे ः महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 59व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत म. ए. सो. गरवारे कॉलेजने सादर केलेल्या बस नं. 153

आसाराम बापूच्या आश्रमात कारमध्ये सापडला मुलीचा मृतदेह | LOK News 24
अपघाताचे वाढते प्रमाण…
चंद्रपूरमध्ये सापडला गर्भवती महिलेचा मृतदेह

पुणे ः महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 59व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत म. ए. सो. गरवारे कॉलेजने सादर केलेल्या बस नं. 1532 एकांकिकेने बाजी मारत यंदाच्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघाला 5001 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेले जयराम हर्डीकर स्मृतिचिन्ह व 5001 रुपयांचे पारितोषिक मएसोचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ण्ड करिअर कोर्सेसे (आयएमसीसी) सादर केलेल्या सखा या एकांकिकेने पटकाविले. स्पर्धेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक आणि 3001 रुपयांचे रोख पारितोषिक विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामतीच्या ‘पाटी’ एकांकिकेने तर सांघिक तृतीय पारितोषिक संजीव करंडक आणि 2001 रुपयांचे पारितोषिक न्यू आर्टस अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज अहमदनगरच्या ‘देखावा’ या एकांकिकेला जाहीर करण्यात आला. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार आणि रविवारी भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत पोहोचलेल्या नऊ संघाचे तीन सत्रात सादरीकरण झाले. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला असून पारितोषिक वितरण ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे.

COMMENTS