Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयर्न मॅन स्पर्धेत डॉ. जय पोटे यांचा 22 वा क्रमांक

निघोज ः डॉ. जय पोटे यांनी अलीकडेच जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित आयर्न मॅन स्पर्धेत 22 वा क्रमांक मिळवून भारतीयांसाठी अभिमानाची बाब ठरवली आहे. त्यां

निपाणी-निमगाव ते वाटापूर रस्त्याच्या कामाला सुरूवात
पढेगाव व परिसराचे विकास प्रश्‍न सुटले
धक्कादायक… नगर येथील सामाजिक कार्यकर्त्या महिलेवर पोलिसाकडून अत्याचार

निघोज ः डॉ. जय पोटे यांनी अलीकडेच जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित आयर्न मॅन स्पर्धेत 22 वा क्रमांक मिळवून भारतीयांसाठी अभिमानाची बाब ठरवली आहे. त्यांच्या या यशाचा अनुभव कथन आणि मुलाखतीचा कार्यक्रम डीबीएम इंग्लिश मीडियम स्कूल व श्री संत निळोबाराय विद्यालय, राळेगण सिद्धी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन सुनील हजारे, विजय पोटे आणि श्री संत निळोबाराय विद्यालय यांनी केले.
       आयर्न मॅन स्पर्धा ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक आहे, ज्यामध्ये 3.8 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावणे अशा तीन टप्प्यांचा समावेश असतो. डॉ. पोटे यांनी 15 तास 55 मिनिटांत ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करून जागतिक स्तरावर 22 वा क्रमांक पटकावला. कार्यक्रमात डॉ. पोटे यांनी त्यांच्या तयारीचा आणि स्पर्धेतील अनुभवाचा विद्यार्थ्यांसोबत सविस्तर शेअर केला. विद्यार्थ्यांनी स्पर्धेबद्दल विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना, त्यांनी मेहनत, चिकाटी आणि ध्येयासक्तीचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पठारे यांनी केले. उपस्थित मान्यवरांमध्ये प्राचार्य सोपान घाणे, सुनील हजारे, विजय पोटे, डॉ. राम पोटे, तसेच डीबीएम इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य जेडी मापारी आणि सर्व विद्यार्थी, शिक्षकवर्ग यांचा समावेश होता. अण्णा हजारे यांनी आपल्या आशीर्वचनात डॉ. जय पोटे यांचे कौतुक करताना सांगितले, डॉ. पोटे यांनी मिळवलेले यश हे फक्त त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे पुढील पिढीला योग्य दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी दिशा मिळेल.

डीबीएम इंग्लिश स्कूलच्या वतीने गौरव – डॉ. जय पोटे यांच्या उत्तुंग यशाबद्दल ऊइच् इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने, सर्व उपस्थितांच्या समक्ष प्राचार्य जेडी मापारी, पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे आणि प्राचार्य सोपान घाणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी, विद्यार्थ्यांसाठी सुनील हजारे, विजय पोटे आणि मित्र मंडळ यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाचा समारोप आनंदमय वातावरणात झाला

COMMENTS